Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोरगाव-सुपे रस्त्यावर मुर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिकाजवळ पकडली ३० लाखाची दारू,चौघांना अटक

Date:

आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोव्याच्या दारूची महारष्ट्रात स्मगलिंग

पुणे- मोरगाव-सुपे रस्त्यावर मुर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिकाजवळ राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने ३० लाखाची गोव्याची दारू पकडली. ज्यात १२ लाख ६१ हजाराच्या विदेशी मद्याचा समावेश आहे. गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दारूची स्मगलिंग होत असून आता राज्य उत्पादन खात्याने याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , संचालक (अं.व.द.) , प्रसाद सुर्वे,यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर , अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने आज रोजी गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या अहमदनगर जिल्ह्याकडे होत असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने मोहिम राबवून, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार वाहनांच्या तपासणी दरम्यान आज दि. १६/०६/२०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड विभागातील मोरगाव-सुपे रस्त्यावर मुर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिका नजिक संशयित वाहन क्र. एमएच १६ सीडी ५४१९ हे बोलेरो पिक-अप वाहन व वाहन क्र. एमएच १२ एमएफ ६५७५ ही ह्युदाई कंपनीची क्रेटा गाडी थांबवून वाहन चालकांकडे वाहनामध्ये काय आहे, याबाबत चौकशी केली असता, दोन्ही वाहनचालक यांनी समाधानकारकपणे उत्तर न दिल्याने वाहने रोडच्या बाजूला घेऊन तपासणी केली असता, वाहनामध्ये आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले विविध विदेशी मद्य ब्रँडचे एकूण १२६१०००/- रु. किंमतीचे विदेशी मद्य तसेच दोन चारचाकी वाहने – अं. किंमत रु. १७५००००/- तसेच दोन मोबाईल हँडसेट- अं. किंमत ६००००/- असा एकूण रु. ३०७१०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा मद्यसाठा अहमदनगर जिल्ह्यात विक्री करण्याचे उद्देशाने परराज्यातून वाहतूक करुन आणल्याचे आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०,८१,८३,९० व १०८ अन्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड यांचेकडील गु. र. क्र. १२८/२०२४ दि. १६/०६/२०२४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर आरोर्पीमध्ये १. नामदेव हरिभाऊ खैरे, २. संदीप बबन सानप, ३. गोरख भगवान पालवे, ४. महेश गुलाबराव औताडे (सर्व रा. अहमदनगर जिल्हा) यांना अटक केली.
सदर कारवाईत निरीक्षक श्री. विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप झुंजरुक, जवान शुभम भोईटे, जवान नि. वाहन चालक केशव वामने, जवान नवनाथ पडवळ, जवान अशोक पाटील, जवान चंद्रकांत इंगळे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रदीप झुंजरुक (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड- २) हे करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा -भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

पुणे -आज पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या...

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...