Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सोनू सूद यांनी कुवेत आग दुर्घटनेबद्दल चिंता केली व्यक्त लोकांना आणि सरकारला मदतीसाठी केलं आवाहन 

Date:


 सोनू सूद कुवेतच्या आगीच्या घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांबद्दल बोलला आणि सर्वांना त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देण्याचे केलं आवाहन 
 अभिनेता परोपकारी सोनू सूदने कुवेतमध्ये नुकत्याच घडलेल्या भयानक घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आगीच्या भीषण घटनेत भारतातील 40 हून अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे याबद्दल बोलताना ‘फतेह’ स्टार अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर व्यक्ती आणि सरकारला या घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील कामगार कसे उदरनिर्वाहासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी संघर्ष करतात यावर त्याने भाष्य केलं असून सरकारला त्यांच्या कुटुंबांना काळजी आणि आर्थिक सहाय्य किंवा नोकऱ्या देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरुन त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि त्यांचे कुटुंब सुरळीत चालू राहतील. 

https://www.instagram.com/reel/C8LjBr_SqLo/?igsh=MTJ0Y3VrZmVudm9xOA==

 जनतेच्या नायकाने व्हिडिओ शेअर करताच त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याची चिंता व्यक्त करत त्याचे कौतुक केले. अशा गंभीर घटनांच्या वेळी तो गरजूंना मदत करण्यासाठी कसा पुढे येतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. एका युजरने कमेंट केली, “बॉलिवुड इंडस्ट्री के प्रामाणिक हिरो”, तर दुसऱ्याने “गरीबांचा मसिहा” अशी कमेंट केली. 
 अभिनेता त्याच्या चाहत्यांची मने जिंकत असताना लवकरच तो फतेह घेऊन येणार असून सोनू सूद सायबर क्राइम थ्रिलर ‘फतेह’ मध्ये दिसणार आहे. जो हॉलीवूडच्या कलाकारांच्या बरोबरीने असल्याचे वचन देतो. अभिनेता नसीरुद्दीन शाह हॅकरच्या भूमिकेत असल्याची अफवा आहे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...