१४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन
मुंबई, दि.१२ : ५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका दिनांक १४ जून २०२४ सादर करायच्या आहेत. त्यामुळे प्रवेशिका सादर करण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले असून निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.
या प्रवेशिका महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या जनसंपर्क विभागात उपलब्ध असून याच विभागात सादर करायच्या आहेत. या प्रवेशिकेस देण्यात आलेली ही अंतिम मुदतवाढ असल्याने निर्मात्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी असे महामंडळ प्रशासनाने आवाहन केले आहे.