pune-
वारकरी आचरसंहिता परिषद व निलेश महाराज झरेगावकर संकल्पित राष्ट्रसंत अाचार्य स्वामी गाेविंदगिरी महाराज यांच्या अमृत महाेत्सवा निमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यासाठी स्वामी गाेविंदगिरी महाराज यांच्या उपस्थिीतीत किर्तन साेहाळा पार पडला. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘जे खळांची व्यंकटी सांडाे तय सतर्क्मी रती वाढाे’ या पसायदनाच्या अाकांक्षाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण करणारा कीर्तन साेहळा पार पडला. यावेळी स्वामी गाेविंदगिरी महाराज यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले.
कारागृहातील चार भिंतीच्या अात बंदीस्त बंदीजणांच्या मनावर कीर्तनाच्या अभिसिंचनाने मन परिवर्तन घडवण्याचे दृष्टीने या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी राज्य कारागृह विभागाचे अपर पाेलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पाेलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे यांचे मार्गदर्शनाखाली राबवणात अाला. या कार्यक्रमाचे नियाेजन येरवडा मध्यवर्ती कारागृह विभागाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, येरवडा खुले कारागृह अधीक्षक अनिल खामकर, उपअधथीक्षक पी.पी.कदम, डाॅ.भाईदास ढाेले, पाेलीस निरीक्षक दक्षता पथक मंजिरी कुलकर्णी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सी.अार.सांगळे, तरुंगाधिकारी व्ही.के.खराडे, भजनी मंडळ, देवाची अाळंदी यांनी कामकाज पाहिले.
बालकुमार संस्थेच्या विश्वस्त पदी शिरीष चिटणीस यांची निवड
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेच्या विश्वस्तपदी सातारा येथील बालसाहित्य चळवळ राबविणारे शिरीष चिटणीस यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती असे संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली आहे.
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था ही बालसाहित्यात कार्य करणारी संस्था असून महाराष्ट्रात या संस्थेच्या पाच शाखा आहेत. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारीणीच्या सभेत विश्वस्तपदासाठी शिरीष चिटणीस यांच्या नावाची निवड सर्वानुमते करण्यात आली. शिरीष चिटणीस हे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह असून सातारा येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.