चित्रपट निर्मात्या प्रेरणा अरोरा म्हणते ” की ती पुरुषप्रधान बॉलीवूडमध्ये ‘उत्कृष्ट’ आहे पण आजही महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटांना ‘असमान’ वागणूक मिळते ? “
भारतीय चित्रपट उद्योगासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात फार कमी महिलांना स्वत:साठी एक वेगळं आणि तितकच खास स्थान मिळवता आल आहे. आजही अनेकांना महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटाची पाठराखण करावी लागली असून गेल्या काही वर्षांत अनेक महिलांनी त्यांना हव्या त्या कथा सांगण्यास आणि सक्षम होण्यासाठी चित्रपट निर्मितीचा व्यवसाय स्वीकारला आहे.
क्रिती सॅनन, आलिया भट्ट आणि इतरांसारख्या अभिनेत्रींनी त्यांना ज्या प्रकारचा कंटेंट बनवायला आवडेल अशा प्रकारची निर्मिती करण्यास सुरुवात केली तेव्हा या इंडस्ट्रीत मोठा बदल होत आहे आणि यांच्या प्रवासात प्रेरणा अरोरा, एकता कपूर, रिया कपूर, गुनीत मोंगा आणि इतरांसारख्या चित्रपट निर्मात्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
प्रेरणा या बद्दल बोलताना म्हणते ” आम्ही खूप पुढे आलो आहोत पण आजही नायकांच्या नेतृत्वाखालील मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या तुलनेत महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटांना तितकं महत्त्वपूर्ण स्थान दिलं जात नाही आणि असमान वागणूक मिळत आहे. एक काळ असा होता जेव्हा चित्रपटाच्या सेटवर एकही महिला नसायची आज कमीत कमी 30-50% स्त्रिया त्यांच्या कथा सांगतात. लिंग समानता आणि त्याबाबतच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना प्रेरणा सांगते ” पाहा ‘क्रू’ने कसा पल्ला गाठला ! खूप लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आम्ही अर्ध्या वाटेवर पोहोचलो आहोत ” अस ती म्हणते !
प्रेरणा अरोरा निर्माती म्हणून तिचा प्रवास सुरू केल्यापासूनच आउट-ऑफ-द-बॉक्स प्रोजेक्ट्स घेऊन आली आहे. तिच्या फिल्मोग्राफीमध्ये ‘पॅडमॅन’, ‘परी’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘रुस्तम’ सारख्या काही चित्रपटांचा समावेश आहे. आता ती तिचे दोन चित्रपट ‘हिरो हिरोईन’ आणि ‘डंक: वन्स बिटन ट्वीस शाई’च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे जे लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.