पुणे- शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बाप लेकीची कहाणी राजकीय इतिहासात नक्कीच सोनेरी पानावर लिहिली जाईल.८४ वर्षे वयाचे,दुर्धर आजाराशी मुकाबला करत संघर्षमय जीवन जगणाऱ्या बापाच्या लेकीवरील प्रेमाची दास्तान या निवडणुकीत अनुभवायला मिळाली. पुतण्याने व त्याच्या कुटुंबाने जरी पाठ फिरविली तरी लेकीसाठी लढलेला बाप,आणि श्रमलेल्या बापाच्या पाठीशी खंबीर उभी राहिलेली लेक यांची अजरामर कहाणी मराठी राजकारणात कायम आपला ठळकपणे जाणवेल.आता याच संघर्षाच्या मुळाशी असलेले मोदी,शहांची,फडणवीसांची सत्ता उलथवून लावण्यासाठी हा बाप दिल्लीत लढतो आहे. ज्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लाऊन लेक सुप्रिया आणि भावाची जागा घेतलेला तरुण लढवय्या अमोल कोल्हे या मराठी अस्मितेच्या ऐतिहासिक राजकीय द्वंदाचे सैनिक बनणार आहेत.
मोदीराज पुन्हा येऊ नये म्हणून..
शरद पवार दिल्लीत म्हणाले-आज संध्याकाळी I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत सर्व निर्णय घेतले जातील.आम्ही सर्व संभाव्य मार्गांवर चर्चा करू. I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुंबईहून दिल्लीला पोहोचले आहेत.शरद पवार म्हणाले- मी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी बोललो नाही. मी आत्ता त्याच्याशी बोलणार नाही.इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, तेव्हाच बोलेन