लोणावळा, ५ जून, २०२४:
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवार ५ जून २०२४ रोजी संपूर्ण भारतवर्षातील १८ पर्वतीय पर्यटन स्थळांवर विशाल वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मध्ये महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर,पाचगणी,पन्हाळा,सोमेश्वर या पर्यटन स्थळांचा समावेश होता.
या अभियानासाठी श्री.जोगिंदर मनचंदा (मेम्बर इंचार्ज, अकाउंट संत निरंकारी मंडल दिल्ली), शरद कुलकर्णी (उपमुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद), संत निरंकारी मंडळाचे श्री.ताराचंद करमचंदानी (पुणे झोनल इंचार्ज) तसेच पालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.
सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन झोन पुणेच्या माध्यमातून लोणावळा, खंडाळा येथील मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते,खंडाळा ते अमृतांजन पॉईंट,वलवन तळे, कावेरी फार्म,नागरगाव,लोहगड उद्यान,रायवूड ते लोणावळा डॅम गेट,राजमाची, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन,नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा या ठिकाणी स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्तगण आणि लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी एकत्रीतपणे येऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला.तसेच १०० हुन अधिक झाडे लावण्यात आली. पद रॅली व पथनाट्ये सादर करून तसेच सर्व स्वयंसेवकांनी हातामध्ये पर्यावरण रक्षणविषयक घोषणाफलक, बॅनर्स उंचावून मानवी साखळी निर्माण करून नागरिकांमध्ये वायू प्रदूषण रोखण्याविषयी जण-जागृती निर्माण केली.
कार्यक्रम समाप्तीनंतर अभियानाद्वारे दिल्या गेलेल्या स्वच्छता संदेशाच्या प्रती जागरूक राहण्याचा संकल्प सर्वांनी केला. श्री.किशनलाल अडवाणी(क्षेत्रीय संचालक) आणि अवनीत तावरे (क्षेत्रीय संचालक) यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान संपन्न झाले. संत निरंकारी मंडळाचे श्री.महादेव सुतार (लोणावळा मुखी), यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.