डॉ. अमोल कोल्हे– हा विजय शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समर्पित !मायबाप जनतेचा आशीर्वाद, स्वाभिमानी सहकाऱ्यांची साथ, लोकनेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस नेते श्री. राहुलजी गांधी, आम आदमी पार्टीचे श्री. अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेला विश्वास या बळावर आपण हा विजय मिळवला आहे.आपला हा विजय म्हणजे केवळ मतांची बेरीज – वजाबाकी नाही, हा महाराष्ट्राने देशाला दिलेला खरमरीत संदेश आहे. महाराष्ट्रासोबत गद्दारी कराल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान कराल तर हा स्वाभिमानी महाराष्ट्र शांत बसणार नाही, महाराष्ट्राचा हाच करारी बाणा कायम ठेवत यापुढेही महाराष्ट्राच्या हितासाठी संसदेत लढत राहणार हा शब्द आहे.या संघर्षात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार!
उमेदवाराचे नाव | पक्ष | मिळालेली मते | मताधिक्य | |
1 | डॉ. अमोल कोल्हे | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार | 698692 | 140951 |
2 | शिवाजीराव आढळराव पाटील | राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टी | 557741 | |
3 | मनोहर वाडेकर | अपक्ष | 28330 | |
4 | अन्वर शेख | वंचित बहुजन आघाडी | 17462 |
शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha Election) शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे 140951 मतांनी
विजयी झाले आहेत.अमोल कोल्हे यांना 6 लाख 98 हजार 692 तर आढळराव पाटील यांना 557741 मते मिळाली आहेत.