मतदारसंघ | विजयी उमेदवार | पराभूत उमेदवार |
नागपूर | नितीन गडकरी, भाजप | विकास ठाकरे, काँग्रेस |
चंद्रपूर | प्रतिभा धानोरकर, काँग्रेस | सुधीर मुनगंटीवार, भाजप |
गडचिरोली-चिमूर | डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस | अशोक नेते, भाजप |
परभणी | संजय जाधव, शिवसेना (ठाकरे) | महादेव जानकर, रासप |
बारामती | सुप्रिया सुळे, एनसीपी (शरद पवार) | सुुनेत्रा पवार, एनसीपी (अजित पवार) |
पुणे | मुरलीधर मोहोळ, भाजप | रवींद्र धंगेकर, काँग्रेस |
मुंबई साऊथ सेंट्रल | अनिल देसाई, शिवसेना, (ठाकरे) | राहुल शेवाळे, शिवसेना (शिंदे) |
कोल्हापूर | शाहू महाराज, काँग्रेस | संजय मंडलिक, शिवसेना (शिंदे) |
बुलढाणा | प्रतापराव जाधव, शिवसेना (शिंदे) | प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना (ठाकरे) |
शिरूर | अमोल कोल्हे, एनसीपी (शरद पवार) | शिवाजीराव आढळराव, एनसीपी (अजित पवार) |
सातारा | छत्रपती उदयनराजे भोसले | शशिकांत शिंदे, एनसीपी (शरद पवार) |
मुंबई नॉर्थ | पीयूष गोयल, भाजप | भूषण पाटील, काँग्रेस |
मुंबई साऊथ | अरविंद सावंत, शिवसेना (ठाकरे) | यामिनी जाधव, शिवसेना (शिंदे) |
पालघर | डॉ. हेमंत विष्णू सावरा, भाजप | भारती कामडी, शिवसेना (ठाकरे) |
जळगाव | स्मिता वाघ, भाजप | करण पवार, शिवसेना (ठाकरे) |
भंडारा-गोंदिया | डॉ. प्रशांत पडोळे, काँग्रेस | सुनील मेंढे, भाजप |
नाशिक | राजाभाऊ वाजे, शिवसेना (ठाकरे) | हेमंत गोडसे, शिवसेना (शिंदे) |
मुंबई नॉर्थ सेंट्रल | वर्षा एकनाथ गायकवाड, काँग्रेस | उज्ज्वल निकम, भाजप |
कल्याण | श्रीकांत शिंदे, शिवसेना (शिंदे) | वैशाली दरेकर, शिवसेना (ठाकरे) |
ठाणे | नरेश म्हस्के, शिवसेना (शिंदे) | राजन विचारे, शिवसेना (ठाकरे) |
रायगड | सुनील तटकरे, एनसीपी (अजित पवार) | अनंत गीते, शिवसेना (ठाकरे) |
अमरावती | बळवंत वानखेडे, काँग्रेस | नवनीत राणा, भाजप |
वर्धा | अमर काळे, एनसीपी (शरद पवार) | रामदास तडस, भाजप |
धाराशिव | ओमराजे निंबाळकर, शिवसेना (ठाकरे) | अर्चना पाटील, एनसीपी (अजित पवार) |
रत्नागिरी-सिंधुदुर्ग | नारायण राणे, भाजप | विनायक राऊत, शिवसेना (ठाकरे) |
अकोला | अनुप धोत्रे, भाजप | डॉ. अभय काशिनाथ पाटील, काँग्रेस |
जालना | डॉ. कल्याण काळे, काँग्रेस | रावसाहेब दानवे, भाजप |
संभाजीनगर | संदीपान भुमरे, शिवसेना (शिंदे) | चंद्रकांत खैरे, शिवसेना (ठाकरे) |
अहमदनगर | नीलेश लंके, एनसीपी (शरद पवार) | सुजय विखे-पाटील, भाजप |
रावेर | रक्षा खडसे, भाजप | श्रीराम पाटील, एनसीपी (शरद पवार) |
मावळ | श्रीरंग बारणे, शिवसेना (शिंदे) | संजोग वाघेरे – पाटील, शिवसेना (ठाकरे) |
सोलापूर | प्रणिती शिंदे, काँग्रेस | राम सातपुते, भाजप |
माढा | धैर्यशील मोहिते पाटील, एनसीपी (शरद पवार) | रणजीत निंबाळकर, भाजप |
लातूर | डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेस | सुधाकर श्रृंगारे, भाजप |
हिंगोली | नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना (ठाकरे) | बाबूराव कदम कोहळीकर, शिवसेना (शिंदे) |
हातकणंगले | धैर्यशील माने, शिवसेना (शिंदे) | सत्यजित पाटील, शिवसेना (ठाकरे) |
यवतमाळ-वाशिम | संजय देशमुख, शिवसेना (ठाकरे) | राजश्री पाटील, शिवसेना (शिंदे) |
शिर्डी | भाऊसाहेब वाघचौरे, शिवसेना (ठाकरे) | सदाशिव लोखंडे, शिवसेना (शिंदे) |
सांगली | विशाल पाटील, अपक्ष | संजयकाका पाटील, भाजप |
नंदुरबार | गोवाल पाडवी, काँग्रेस | डॉ. हिना गावित, भाजप |
भिवंडी | सुरेश म्हात्रे, एनसीपी (शरद पवार) | कपिल पाटील, भाजप |
दिंडोरी | भास्कर भगरे, एनसीपी (शरद पवार) | भारती पवार, भाजप |
रामटेक | श्यामकुमार बर्वे, काँग्रेस | राजू पारवे, शिवसेना (शिंदे) |
मुंबई नॉर्थ ईस्ट | संजय दिना पाटील, शिवसेना (ठाकरे) | मिहिर कोटेचा, भाजप |
नांदेड | वसंतराव चव्हाण, काँग्रेस | प्रतापराव चिखलीकर, भाजप |
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे .मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.
रत्नागिरीत भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत.रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते पराभूत झाले आहेत.हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर पराभूत झाले आहेत.
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.