- टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सच्या MyDigiAccount पोर्टलवर पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमार्फत मिळेल १ लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन
- कमीत कमी कागदपत्रे आणि स्पर्धात्मक व्याजदर
मुंबई, २७ मे २०२४: भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने (टाटा एआयए) आपल्या ग्राहकांसाठी एक क्रांतिकारी सेवा सुरु केली आहे. टाटा एआयएच्या पॉलिसीधारकांना अचानक पैशांची गरज भासल्यास, आपले विमा संरक्षण गमवावे न लागता, विमा पॉलिसीवर १ लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन मिळवता येईल. टाटा एआयएच्या अत्याधुनिक MyDigiAccount पोर्टलमार्फत लोनची रक्कम फक्त १ मिनिटाच्या आत ग्राहकांच्या खात्यावर जमा केली जाते. सेवा सुरु करण्यात आल्यापासून, या डिजिटल–फर्स्ट उपक्रमामध्ये ५०० पेक्षा जास्त विनंत्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे आणि जवळपास ५.५ कोटी रुपयांची कर्जं दिली गेली आहेत. अशाप्रकारे टाटा एआयएने आपल्या पॉलिसीधारकांसाठी अतिशय सुविधाजनक लिक्विडीटी उपाय प्रस्तुत केले आहेत.
या सुविधेचा लाभ घेऊन टाटा एआयएचे ग्राहक निवडक जीवन विमा पॉलिसींच्या सरंडर व्हॅल्यूवर लोन घेऊ शकतात. खूपच कमी कागदपत्रे आणि स्पर्धात्मक व्याज दर यांचा लाभ घेत तातडीने रक्कम मिळवू शकतात. पॉलिसीधारक काहीही उधार न ठेवता, तसेच क्रेडिट तपासणी केली न जाता, दर साल ८.८० % व्याज दराने लोन घेऊ शकतील. पर्सनल लोनच्या सध्याच्या व्याज दरांच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया खूपच सुव्यवस्थित आहे, त्यामुळे लोन अप्रूव्हलला होणारा उशीर यामध्ये होत नाही आणि अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पॉलिसीधारकाला आपली रक्कम मिळते.
टाटा एआयएचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि संचालन प्रमुख श्री संजय अरोरा यांनी सांगितले, “अचानक पैशांची गरज कोणालाही, कधीही भासू शकते, अशावेळी आपल्या प्रियजनांच्या आर्थिक सुरक्षेशी तडजोड करण्याची कोणाचीच इच्छा नसते. इन्स्टंट लोन सुविधा आमच्या ग्राहकांप्रती आमची बांधिलकी अधोरेखित करते, कोणत्याही परिस्थितीत आणि आपल्या पॉलिसीबाबत त्यांना चिंतामुक्त राहता यावे असा आमचा प्रयत्न असतो. आम्हाला गर्व आहे की, या उद्योगक्षेत्रामध्ये लोन पेआऊटसाठी डिजिटल एन्ड–टू–एन्ड सुविधा प्रदान करणारी आमची पहिली कंपनी आहे. ग्राहकांना असामान्य अनुभव प्रदान करण्याची आणि विमा उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आमची वचनबद्धता यातून दिसून येते.”
उद्योगक्षेत्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार समजते की, दरवर्षी अनेक जीवन विमा पॉलिसी लॅप्स होतात. आयआरडीएआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सरंडर/विथड्रॉवलसाठी दिल्या जाणाऱ्या लाभांमध्ये २६.५२% ची वाढ होऊन ते १.९८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ही आकडेवारी मॅच्युरिटीच्या खूप आधी सरंडर केल्या जाणाऱ्या जीवन विमा पॉलिसींची संख्या दर्शवते. अचानक रकमेची आवश्यकता भासणे किंवा आर्थिक संसाधनांची कमतरता अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. अशावेळी टाटा एआयएचे पॉलिसीधारक आपल्या टाटा एआयए विमा पॉलिसीवर लोन घेऊ शकतात. पारंपरिक पॉलिसीच्या सरंडर व्हॅल्यूवर लोन दिले जाते; सरंडर व्हॅल्यू म्हणजे अशी रक्कम जी पॉलिसीधारकांना पॉलिसी मॅच्युरिटीच्या आधी समाप्त केल्यावर मिळते.
पॉलिसीवर लोन सुविधेमध्ये पॉलिसीधारक वेळखाऊ लोन प्रोक्युअरमेंट प्रक्रियेपासून वाचू शकतात आणि यामध्ये व्याज दर पर्सनल लोनच्या तुलनेत कमी असतो. ग्राहक कर्जाची परतफेड आपल्या सोयीनुसार करू शकतात, शिल्लक रक्कम विमा दावा रक्कम देताना ऍडजस्ट केली जाते. रोख रक्कम प्रवाहामध्ये अडचणींमुळे लोन मिळवण्यात अडचणी येणाऱ्या व्यक्तींना ही सेवा खूप उपयोगी पडू शकते. बँका आणि एनबीएफसी लोन देताना क्रेडिट स्कोर पाहतात पण टाटा एआयए आपल्या पॉलिसीधारकांचा क्रेडिट स्कोर तपासत नाही आणि काही गहाण देखील ठेवावे लागत नाही.
टाटा एआयए लाईफ आणि इन्स्टंट लोन सुविधेबद्दल अधिक माहितीसाठी कृपया https://www.tataaia.com/ जा.