पुणे, दि. २८ : विश्रांतवाडी येथील १००० मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट १, संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह व कोरेगाव पार्क येथील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या वसतिगृहात कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय गुणवत्तेवर प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
वसतिगृहाच्या प्रवेशासाठी विश्रांतवाडी येथील युनिट क्रमांक १ वसतिगृहात प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुकांनी वसतिगृहातून विनामुल्य प्रवेश अर्ज घेवून जावे, असे आवाहन वसतिगृहाचे गृहप्रमुख पी. बी. सुतार यांनी केले आहे.
0000