चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद यांच्या सोशल मीडिया पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिग्दर्शक-निर्मात्याने सैफ अली खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि तेव्हा पासून सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं होत पण आता बातमी पक्की आहे सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे दोघं आगामी चित्रपटासाठी सोबत येत आहेत.
सिद्धार्थ आनंद ने कॅप्शनमध्ये लिहिले होते ” माझ्या पहिल्या हिरो सोबत सेटवर परत येत आहे ” सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान तब्बल 17 वर्षांनंतर एकमेकांसोबत काम करणार असून चाहत्यांना आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे. सिद्धार्थने रॉबी ग्रेवाल आणि सैफचा एक फोटो शेअर करून या तिघांच्या नव्या कोऱ्या चित्रपटाच नाव ठरवलं आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाच नाव “ज्वेल थीफ- द रेड सन चॅप्टर” असे असणार आहे असं सिद्धार्थ आनंद यांनी सांगितल आहे.
https://www.instagram.com/p/C7eS6VuJvz-/
निर्मात्या ममता आनंदसोबत सिद्धार्थ ‘मार्फ्लिक्स पिक्चर्स’ अंतर्गत या प्रकल्पाची निर्मिती करत आहे तर रॉबी ग्रेवाल याचे दिग्दर्शन करत आहेत. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या या जोडणीने या प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत. या प्रकल्पात जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि अहवालानुसार हा प्रकल्प सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यातील खास नात दाखवणार असून हा चित्रपट थेट-टू-डिजिटल रिलीज होईल.
सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, सैफ अली खान आणि रॉबी ग्रेवाल यांच्यासह उर्वरित कलाकार आणि क्रू सध्या बुडापेस्टमध्ये या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहेत. सिद्धार्थ यांनी यापूर्वी ‘सलाम नमस्ते’ आणि ‘ता रा रम पम’ साठी एकत्र काम केले आहे. आता, हे त्रिकूट पडद्यावर काय आणणार आहे हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत!