पुणे, दि. २७ : अग्निवीर जनरल ड्युटी (अग्निवीर जीडी), अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर लिपिक ( अग्निवीर कार्यालय सहाय्यक) या पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन १ ते ८ जुलै या कालावधीत जाट रेजिमेंट केंद्र (जेआरसी) बरेली येथे युनिट हेडक्वार्टर कोटा (यूएचक्यू ) अंतर्गत आयोजन करण्यात आले आहे.
या भरती मेळाव्यात सर्व श्रेणीतील युद्ध विधवांची मुले, सेवेतील सैनिक, माजी सैनिकांचा मुलगा आणि लढाईतील जखमी तसेच जाट रेजिमेंटचे माजी सैनिक, सेवेतील सैनिक, कर्मचाऱ्यांचे कायदेशीर दत्तक पुत्र, सख्खे भाऊ, मुलगा, वास्तविक भाऊ, युद्धातील अपघातग्रस्त, इतर रजिमेंटच्या आजी, माजी सैनिकांचे कायदेशीर दत्तकपुत्र आणि उत्कृष्ट खेळाडू यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेप्टनंट हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.
००००