पुणे :
संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला वासंतिक उटी व मोगरा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोगर्याच्या फुलांनी आकर्षक सजावटीने संपुर्ण गाभारा विलोभनीय दिसून येत होते. तर फुलांच्या वासाने संपूर्ण मंदिर परिसर दरवळून गेले होते.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ओळख आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. अक्षय तृतीयेनिनिमित्त आंब्याची आरस बाप्पाला सजाविण्यात आली होती. तर रविवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोगरा मोहत्सव साजरा करण्यात आला. मंदिराच्या संपुर्ण गाभार्यात मोगर्याच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
यावेळी भारतीय बनावटीच्या पहिल्या आण्विक पाणबुडी प्रकल्पाचे प्रमुख आणि परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक व्हाईस अॅडमिरल डीएसपी वर्मा यांच्या हस्ते बप्पाची आरती करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, युवा पिढीने भारतीय संस्कृती व भारतीय परंपरांचा अभ्यास करून त्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाला भेट दिल्यानंतर एक नविन उर्जा मिळाली. येथील इतिहास जाणून घेतना आपल्या क्रांतिकारकांनी किती कष्ट घेतले याची पदोपदी जाणीव या भवनातून दिसून येत असल्याचे त्यांनी वर्मा यांनी सांगितले.
श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपतीला मोगर्यांची आरस
Date: