पुणे:- ” गायकीतले सातत्याचा रियाज हाच कुठल्याही स्पर्धेत यश देत असतो जी गाणी आपण स्पर्धेत गातो ती गाणी मूळ गायकांनी खूप परिश्रम वरीयाजातून गायलेली असतात तेव्हा स्पर्धेसाठी गाण्याची तात्पुरती तयारी न करता रियाजानेच तयार होऊन स्पर्धेत भाग घ्यावा, तसेच कराओके संगीत गायकाला गाण्याचा आनंद देतात आवड निर्माण करतात मात्र पण गायन क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी व भविष्य घडविण्यासाठी रियाज हाच अत्यंत महत्त्वाचा आहे” असे पुणे आयडॉल गायन स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून अपर्णा संत यांनी मत व्यक्त केले.
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित 22 व्या गायन स्पर्धेचे उद्घाटन आज पंडित भीमसेन जोशी सभागृह औंध येथे झाले,चार गटात 457 सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी 110 लिटिल चॅम्प्स गायक कलाकारांनी आज प्राथमिक फेरीत आपले सादरीकरण केले. पुढील तीन दिवसात 120 युवा,137 जनरल,90 ओल्ड इज गोल्ड प्राथमिक फेरीत येथे सादरीकरण करतील. पहिल्या दिवशी विवेक पांडे,जितेंद्र भूरूक, कोमल कृष्णा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे संयोजक सनी निम्हण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले उद्घाटन प्रसंगी माजी महापौर दत्ता गायकवाड माजी नगरसेवक आदित्य माळवे, वसंत जुनवणे, तानाजी चोंधे, सुप्रीम चोंधे औंधगाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल गायकवाड सहकारी गृहरचना संस्था अध्यक्ष प्रीती शिरोदे, योगेश जुनवणे, बिपिन मोदी, बाळासाहेब मदने, वनमला कांबळे, सचिन मानवतकर व्यासपीठावर उपस्थित होते.
फाउंडेशनच्या वतीने उमेश वाघ यांनी सर्वांचे स्वागत अमित मुरकुटे यांनी आभार तर महेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
गणेश शेलार,प्रमोद कांबळे,अनिकेत कपोते ,वाडेश्वर सुतार,संजय तारडे संजय माझीरे, अभिषेक परदेशी, टिंकू दास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.
गायकीतला रियाज हाच स्पर्धेत यश देत असतो -अपर्णा संत
Date: