पुणे- आता थांबेल , मग थांबेल म्हणता म्हणता Drunk drive अग्रवाल बिल्डरच्या प्रकरणात रोज नवनवी भर पडतच आहे आता एक पोर्शे ‘हिट अँड रन’वर आपल्या लोकात संताप उसळेल असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय . त्यात एका रॅप सॉंगच्या माध्यमातून एक अल्पवयीन मुलगा ‘हिट अँड रन’वर चक्क रॅप साँगमधून मल्लिनाथी करतोय. त्यात फिर से दिखाऊंगा सड़क पर खेल, म्हणत … अजून खुन्नस देतोय असे चित्र एकीकडे आहे तर दुसरीकडे आता पैश्यांची मस्ती पुणेकर सहन करणार नाय…..कमिशनर हटाव,पुणे बचाव…. असा नवा पवित्रा आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे .
https://x.com/DhangekarINC/status/1793644648440959208
आपली भूमिका मांडण्यासाठी आता धंगेकर यांनी ट्विटर अर्थात x चा सहारा आता घेतला आहे.
https://x.com/DhangekarINC/status/1793583568276570354
आज धंगेकर यांनी ट्विटर पोस्ट करून काय म्हटले आहे ते वाचा त्यांच्याच शब्दात …
ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली,असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते. आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे.त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्या पासून करायला हवी.या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशनने कुणावरही कारवाई केलेली नाही,याचाच अर्थ असा होतो हा गुन्हा दडपण्याच्या “डिल” मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी,अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत आहे. या प्रकरणात पोलीस कमिशनर यांच्यावर संशय निर्माण अश्या काही बाबी यात समोर आल्या आहेत. १)इतक्या गंभीर प्रकरणात पहिली F.I.R दाखल करताना अक्षम्य अश्या चुका करण्यात आल्या आहेत,ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो. आरोपीने स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली तरी देखील कलम १८५ लपवण्यात आले.तसाच प्रकार ३०४ कलम मध्ये सुद्धा केला.हे कलम जर अगोदर लावले असते तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती. २)कुठल्याही अपघातात त्या कार मधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते ,या प्रकरणात इतर २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे.FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही.अर्थात यासाठी त्या मुलांचा पालकांकडून वेगळी डिल झाली आहे. ३) राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्या FIR पासून ३०४ कलम होता हे ठासून सांगितले प्रत्यक्षात पहिल्या FIR मध्ये त्याचा उल्लेख देखील नाही ,याचाच अर्थ पोलीस कमिश्नर यांनी गृहमंत्र्यांची देखील दिशाभूल केली आहे. ४) आज या घटनेचा ५ वा दिवस आहे.या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले.सर्व व्यवस्थेची बदनामी झाली परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही.याचा अर्थ तपास अधिकाऱ्या पासून ते कमिश्नर पर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे. ५) काल अचानकपणे पुणे शहरातील ४ ते ५ पब आणि रूफटॉप रेस्टॉरंट वर कारवाई करण्यात आली. जर हे सर्व अवैद्य होतं तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली..? पोलीस कमिशनर इतक्या दिवस त्यांच्या पाकिटावर मेहरबान होऊन त्यांना पब चालविण्याची मुभा देत होते का..? त्यामुळे पुणेकरांच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी विनंती आहे की ,विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची,पोलीस प्रशासनाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या पोलीस कमिश्नर यांच्या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे, त्यांची तातडीने बदली करण्यात यावी.