ड्रंक ड्राईव्हचे कारवाई सोबत इतर १९५ कारवाया करुन २,२२,८०० रुपये दंड वसूल
पुणे-दिनांक २२/०५/२०२४ रोजी ००:०० ते ०३:०० वाजेपर्यंत पुणे शहरात मद्यप्राशन करुन वाहन चालवणा-या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचेdrive मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन संयुक्तपणे चतुश्रृंगी, येरवडा, विमानतळ, मुंढवा, कोरेगाव पार्क या ५ पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये प्रत्येकी २ ठिकाणी व उर्वरीत पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये १ ठिकाणी असे संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये ३७ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाई करीता प्रत्येक पोलीस स्टेशन कडील १ पोलीस अधिकारी व ४ अंमलदार व वाहतूक शाखेकडील १ पोलीस अधिकारी व ३ अंमलदार याप्रमाणे एका नाकाबंदीचे ठिकाणी २ पोलीस अधिकारी व ७ अंमलदार नेमण्यात आले होते. ड्रंक ड्राईव्ह कारवाई करीता ब्रेथ अॅनालायझर चा वापर करण्यात आला. या कारवाई मोहिम दरम्यान दरम्यान एकुण १२५५ वाहनांची कसुन तपासणी करुन ८५ वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मुंढवा व सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये सर्वात जास्त प्रत्येकी १० कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच ड्रंक ड्राईव्हचे कारवाई सोबत इतर १९५ कारवाया करुन २,२२,८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारे अचानक नाकाबंदीचे आयोजन करुन या कारवाया पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडुन करण्यात येणार आहेत.