Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? धंगेकरांचा टोला

Date:

पुणे- कल्याणीनगर पोर्शे अपघातातील बिल्डर अग्रवाल आणि त्यांचे जुने नौकरदार असलेले आमदार सुनील टिंगरे वादात असतानाच आता आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात सुंदोपसुंदी सुरु झाली आहे.एकीकडे पोलीस ,पब मालक चालक , बार चालक टार्गेट हत असताना तळीरामांची तळी उचलली जाऊ लागलेली असताना या दोन नेत्यांमधील सुंदोपसुंदी आता रंग भरू लागली आहे. मोहोळ यांनी ३०४ कलम लावलेले आहे प्रथमपासूनच पोलिसांनी असा दावा करत .. धंगेकर साप साप म्हणत भुई थोपटू नका म्हणूनच पुणेकर तुम्हाला नाकरत असतात असे प्रत्युत्तर देताच धंगेकर यांनी तत्क्षणी या त्यांच्या दाव्याची खिल्ली उडवायची संधी सोडलेली नाही . पहा नेमके काय म्हटले आहे धंगेकर यांनी …

इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय….?

तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का…? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात आलेला नाही.का नाही लावला…? सोबत पहिली F.I.R कॉपी जोडतोय.नीट वाचून घ्या. इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय….? पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात ? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत.पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती.

https://x.com/DhangekarINC/status/1793257503288950861

धंगेकर यांनी काय म्हटले होते ते पहा ..काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का…? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. २) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी – मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल.

त्यास प्रत्युत्तर दिले आहे आज मोहोळ यांनी ते काय ते पहा …लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ताल नृत्य अकादमी च्या वतीने दीप्ती बसवार यांचे आरंगेत्रम संपन्न

पुणे - ;- ताल नृत्य अकादमी च्या वतीने नृत्य...

मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी न्यायालयात याचिका दाखल करणार: प्रशांत जगताप

पुणे :तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खा. अरुण सिंह यांनी केले प्रदेश...

पै.सिकंदर शेखने पटकावले ५ लाखाचे बक्षीस

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव २०२५ संपन्न पुणे- येथील बालेवाडी...