पब बार आहेत त्या ठिकाणी दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी नाकाबंदी
पुणे : हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून अब्जावधीची वसुली करणाऱ्या पोलिसांच्या हातही आता आयतेच कोलीत आले आहे .आजवर त्यांनी काय केले हे सोडून द्या , पण आता कल्याणी नगरच्या अपघातावर झालेल्या माध्यमातील आरडाओरड लक्षात ठेवून पोलीस आता (पूर्वीही करतच होते )Drunk and Drive प्रकरणी कठोर कारवाई करून जबरदस्त वसुली करण्याच्या तयारीत आहे. तेव्हा तळीरामांनी आणि एकूणच नागरिकांनी मात्र सावधानता बाळगली पाहिजे आणि आपल्या बार मधील ग्राहकांना गाडीने घरी सोडवण्याची जबाबदारी देखील बार चालविणाऱ्यांवर येऊन ठेपू शकणार आहे .एखादा दुसरा असे काही करून जातो कि नंतर त्याचे भोग साऱ्या गावाला भोगावे लागतात अशा कारवाया सुरु होऊ नयेत म्हणजे झालं . पण आता कारवायांचा वेग तर वाढणार आहेच आणि ते आवश्यक देखील आहे आणि पोलिसांचा महसूल हि त्यानिमिताने वाढणार आहे.
कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघाता प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी शहरामध्ये विविध ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या (Drunk and Drive) कारवाया सुरू केल्या आहेत. मंगळवारी रात्री ८५ मध्ये परिवार कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला. या सोबतच ज्या ज्या ठिकाणी पब बार अशा आस्थापन आहेत त्या ठिकाणी दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री एक ते तीन या कालावधी दरम्यान नाकाबंदी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात येऊन यासंदर्भात पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे.