पुणे–उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे देखील बुडाला आहे. 35 फूट खोल पाण्यात बोट सापडली असली, तरी प्रवाशी मात्र सापडलेले नाहीत. त्यामुळे दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेली बोट 17 तासानंतर सापडली आहे. मात्र सहा प्रवासी बेपत्ता असल्याने एनडीआरएफकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना वादळी वाऱ्याने बोटीचा अपघात झाला. या घटनेत सहा ते सात प्रवासी बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. बुडालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरुच आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरु असताना ही दुर्घटना घडली होती.. बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावाचा काठ गाठला.प्रशासकीय अधिका-यांकडून त्यांनी अगोदर घटनेचा आढावा घेतला.करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट सायंकाळी सहाच्या दरम्यान सुगाव येथून कळाशीकडे उजनीच्या जलाशयातून जात होती . सायंकाळी अचानक वादळी वारा सुरु झाल्याने कळाशीच्या बाजूला पोहचत असताना बोट पाण्यातच उलटली . या बोटीत करमाळा तालुक्यातील झरे येथील एक दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले , कुगाव येथील एक तरुण , एक बोट चालक आणि राहुल डोंगरे नावाचे पोलीस उपनिरीक्षक होते. बोट बुडू लागताच पोलीस अधिकारी डोंगरे यांनी पाण्यात उडी घेऊन पोहत कळाशी गावाचा काठ गाठला व स्थानिकांना बोट बुडाल्याची सूचना दिली. सहा पैकीएकाही प्रवाशाचा शोध लागलेला नाही