पुणे-कल्याणीनगर येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने बार मध्ये पार्टी करून दारू पिऊन भरधाव कार चालवून दोन जणांना चिरडले. याप्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नमन भुतडा, जयेश बोनकर व विशाल अगरवाल यांच्यावर मोटारवाहन अधिनियम १९८८ चे कलम ३,५, १९९ (ए )व अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५) कलम ७७, ७५ नुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नमन प्रल्हाद भुतडा ( वय -25), सचिन काटकर (35), संदीप सांगळे (35) यांना न्यायालयात हजर केले. यावेळी सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायलयाने आरोपीस 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंढवा येथील कोझी या हॉटेल आणि बारचे मालक प्रल्हाद भुतडा, नमन भुतडा व मॅनेजर सचिन अशोक काटकर यांनी मुले अल्पवयीन असताना त्यांना मद्यपुरवठा केला. त्यानंतर सदर आरोप हा हॉटेल ब्लॅक येथे मद्य पिण्याकरिता गेला. त्याठिकाणी हॉटेलचे मॅनेजर संदिप सांगळे व बार काऊंटर जयेश बोनकर यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी मुलांचे वयाची खात्री न करता मद्य दिल्याचे सांगितले.
सरकारी वकील यांनी सांगितले की, आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. पीडित मुलगा हा अल्पवयीन असताना त्यास दारू बार मध्ये दिली गेली. त्याचे वय न पाहता त्याला दोन बार मध्ये मद्य दिले गेले. वयाची कोणती खातरजमा न करता त्यांना दारू दिली. मोटार वाहन कलम गुन्हा अंतर्गत देखील आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
ब्लॅक क्लब मध्ये नोंदणीकृत व्यक्तींना प्रवेश दिला जातो पण आरोपीस कोणत्या मेंबरशिप आधारे प्रवेश दिला गेला आहे चौकशी करणे .मद्य पिण्याबाबत कोणते रेकॉर्ड दिले गेले तपासणे आहे. आरोपी मुलाशिवाय इतर मुलांना कशाप्रकारे प्रवेश दिला गेला आहे. ब्लॅक क्लब हा उच्चभ्रू असून मेरीयट क्लब यांचा नामांकित आहे. जगात त्यांचे साडे आठ हजार फ्रेंचाईज असून ते कायद्याची पायमल्ली करत आहे. क्लब मधील सीसीटिव्ही दिले जात नाही असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले.
ॲड असीम सरोदे म्हणाले, अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर त्याचे वडिलांना तात्काळ अटक करण्यात आली नाही. 304 ए , 279 ही कलमे गुन्ह्यात लावली गेली नाही. बचाव पक्षाचे वकील एस. के .जैन म्हणाले, आरोपी यांनी क्लब मध्ये मुलांना मद्य सेवा दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जे कलम लावले ते अदखलपात्र आहे. त्यात सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असून यात अटकेची देखील गरज नाही.