पुणे -पुण्यातील हिट अॅण्ड प्रकरणात पहिल्या क्षणापासून पोलिसांकडून सक्त कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 304 चे कलम लावले होते. आरोपीला कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला. परंतु बाल न्याय मंडळाच्या निर्णयाने पोलिसांसह आम्हाला देखील धक्का बसला आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलिस आयुक्तालयास अचानक भेट दिली, त्याठिकाणी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला व माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता.त्यात अतिशय स्पष्टपणे कलम 304 नमूद आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं, आणि 16 वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिमांड अॅप्लिकेशनही माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, कलम 304 A नाही तर हा कलम 304 च आहे. अशा प्रकारे पोलिसांनी केलं होतं. दुर्देवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि अडल्ट ट्रीट करण्याचा अर्ज सीन आणि फाईल्ड बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियल्ट अशाप्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा, डिअॅडिक्शन करा, अशाप्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता एक धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे, काय केलं आहे, गाडीचे पुरावे दिले आहेत, तरी देखील त्याकडे न्यायालयाने दुर्लक्ष केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी ठरवलं की, या घटनेत न्याय मिळवायचा आहे. कोर्टाने या संदर्भात सांगितलं की, या बाबत बाल न्यायालयात जावं लागेल. या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार बाल न्यायालय मंडळाला आहे. त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या. आम्ही अर्ज केला. आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. नाही दिली तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा आहे, असे फडणवीस म्हणाले.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेनंतर काही प्रश्न देखील उपस्थित झाले. रेसिडेन्शील पबवर प्रश्नचिन्ह उभा राहतोय. इथे मुलाचं वय पाहिलं जात नाही. पोलिसांसोबत चर्चा झाली असून मोठ्या प्रमाणावर आता ड्रंक अँड ड्राईव्ह संबंधित पोलीस योग्य कारवाई करणार आहेत. ज्यांना लायसन्स मिळाली आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. महापालिकेलाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. एफएलसीचं नवीन लायसन्स देताना नोंद घेतली जाईल. रहिवाशी भागात हे नसावं यावर लक्ष राहील.फडणवीस म्हणाले की, ज्युव्हिनाईल जस्टिस अंतर्गत पालकावर पहिली कारवाई केली जातेय, हे पालकांनी लक्षात ठेवावं. पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल असं पाहिलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा हिनियस क्राईम आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही हे पालकांनी आपल्या मुलांना सांगावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे कारवाई केली आहे. मात्र ज्युनिनाईट जस्टिस बोर्डाच्या भुमिकेमुळे आश्चर्य वाटतं. ज्यांनी दारू सर्व्ह केलीय त्यांच्यावरही कारवाई केली. मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला पोलीसांनी गंभीरपणे घेतलंय. यात न्याय मिळेलच, असा विश्वास आहे.