पुणे दिनांक 21-
राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून काम करताना असंख्य उल्लेखनीय निर्णय घेतले. त्यातील युवा वर्गासाठी जे निर्णय घेतले ते पुझील अनेक पिढ्यांना उपयोगी ठरणारे आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक न.म. जोशी यांनी केले आहे.
भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कात्रज येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास साहीत्यीक व शिक्षणतज्ञ डॅा न म जोशी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज च्या वतीने आयोजित स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॅा न म जोशी म्हणाले की भारतातील विशेष करून, ग्रामिण भागातील गरीब विद्यार्थ्यां करीता शिक्षणाची संधी मिळावी या करीता, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संपुर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यात ‘जवाहर नवोदय विद्यालय’ या निवासी शाळा सुरू केल्या. या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले असंख्य विद्यार्थी आज विविध भागात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच ‘युवकांमध्ये प्रखर राष्ट्रभावना आणि नवचैतन्य निर्माण व्हावे’ यासाठीच् राजीव गांधी यांनी ‘स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरी करण्याची प्रथा देशभर सुरू केली. याची फारच कमी लोकांना जाण आहे, म्हणून राजीव गांधी यांनी युवा पिढीसाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय व प्रशंसनीय ठरते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अघ्यक्ष गोपाळ तिवारी यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की राजीव गांधींचे उमदे नेतृत्व देशास अधिक काळ लाभले असते तर देशाचा चेहरा मोहरा अनेक अर्थाने बदलला असता. येणाऱ्या पिढी पुढे देशातील संगणक व डीजीटल क्रांतीचे जनक, स्थानिक स्वराज्य संस्थामघ्ये ३३% महीला आरक्षण व १८ व्या वर्षी तरूणांना मतदानाचा अघिकार देणाऱ्या स्व राजीव गांधींच्या तत्वधिष्ठीत राजकारणाचे महत्व जोपासले जावे व त्यांचा आदर्श समोर रहावा या ऊद्देशाने त्यांचे स्मारक ऊभारण्यात आल्याचे सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट संघ (रणजी ट्रॅाफी) माजी कप्तान मिलिंद गुंजाळ, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, प्रा डॅा दिलीप गरूड, मा रामचंद्र शेडगे, प्रा संदिपान पवार, मनिषा पाटील, ऊद्यान अधिक्षक डॅा राजकुमार जाधव, ॲड श्रीकांत पाटील, जेष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, राहूल मते, हरीदास अडसूळ, आण्णा गोसावी, पै शंकर शिर्के, गणेश शिंदे, अशोक काळे, सचिन भुमकर, नरसिंह अंदोली, विकास दवे, राजेश सुतार, दिलीप लोळगे इत्यादी उपस्थित होते. स्मारक समिती सदस्य सुभाषशेठ थोरवे, संजय अभंग, धनंजय भिलारे, रमेश सोनकांबळे, गणेश मोरे इ नी उपस्थितांचे तुळशीचे रोप व पुस्तके देऊन स्वागत केले. ॲडव्हकेट फैयाज शेख यांनी आभार मानले.
राजीव गांधींचे युवा-वर्गा’साठी घेतलेले निर्णय अनेक पिढ्यांसाठी फलदायी….. न. म. जोशी
Date: