भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘संगीत रामदासायन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. श्री समर्थ रामदासांचे जीवनकाव्य या कार्यक्रमातून सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे काव्य लेखन श्रीमती प्रतिभाताई गारटकर यांचे होते ,पराग पांडव यांनी सादरीकरण केले.
पवन त्रिभुवन आणि विद्यार्थिनीनी नृत्य सादर केले . श्रद्धा कानिटकर (कीबोर्ड),गणेश तानवडे(तबला),चैतन्य भालेराव (तालवाद्य),अदिती गराडे,नचिकेत हरिदास (हार्मोनियम),ज्ञानेश कोकाटे(पखवाज) यांनी साथसंगत केली.
श्री समर्थ रामदासांच्या जन्मापासूनचा संपूर्ण जीवनप्रवास नृत्य आणि गीतांतून उलगडण्यात आला.श्री समर्थ रामदासांचे बालपणीच्या कथा झाडावर चढून बसणे, ‘ चिंता करतो विश्वाची ‘ ही भावना, सूर्य नमस्कार , १३ कोटी रामाचा जप,११०० मठांची स्थापना, व्यायामशाळा हा सारा जीवन पट उलगडला.
‘शुभमंगल सावधान ‘ , ‘देह हा श्रीरामाचा दास ‘ ‘ राम नाम घे ‘ , ‘ तव भेटीची आस जीवाला ‘ ,श्रीराम जय राम जय जय राम ‘ शिवबाच्या मनी गर्व सूर उमटले, ‘ अशी गीते आणि भैरवी – श्रीरामाच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम शनिवार, दि.१८ मे २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०८ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा सत्कार केला.