राज्यातून दहा पुरस्कार विजेत्यांची निवड : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी, बालभारतीचे किरण केंद्रे यांची उपस्थिती
पुणे : अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार जाहीर वितरण समारंभ असून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक १९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती पुणे येथील सभागृहात होणार आहे, अशी माहिती बालकुमार संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. न. म. जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे तसेच पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे उपस्थित राहणार आहेत.
साहित्य निवड समितीने दिलेल्या निकालानुसार राज्यातून दहा पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली असून पुरस्कारार्थी खालीलप्रमाणे आहेत.
पुरस्कारार्थी : बालकथा विभाग – रेखा बैजल जालना( तुमचा आमचा संजू), रश्मी गुजराथी पुणे (आभाळातील जहाज), नागेश शेवाळकर पुणे (मोबाईल माझा गुरू), बालकाव्य विभाग – मीनाक्षी आचमे नांदेड ( इटूकली पिटूकली) जयश्री पाटील सांगली (बालजगत), ललिता सबनीस पुणे( लहानपण देगा देवा ), बालकादंबरी विभाग – बबन शिंदे हिंगोली ( वंचितांचे राजे छ. शाहू महाराज), बालनाटिका विभाग – शुभदा सुरंगे पुणे ( घर पळून गेलं ), नाट्यछटा विभाग – डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर ( बहुढंगी बहुरंगी ), मुलांचा काव्यसंग्रह विभाग – मसाप मावळ शाखा (परीघ).