सीसी टीव्ही यंत्रणा बंद नव्हतीच तर टीव्हीचे केवळ स्क्रीन बंद पडलेले होते–अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा दावा
पुणे- अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सोशल मिडियातून लक्ष्मीकांत खाबिया यांनी बारामती EVM मशीन गोडाऊन ची cc tv यंत्रणा बंद असल्याचा आरोप फेटाळत हि अफवा असल्याचा दावा करून रोहित पवारांना CC TV नियंत्रण कक्षाची इथंभूत माहिती कशी मिळाली ? असा सवाल केला आहे ते म्हणाले , इथले सीसी टीव्ही यंत्रणा बंद नव्हतीच तर टीव्हीचे केवळ स्क्रीन बंद पडलेले होते ,पण प्रश्न असा आहे इथली इथांभूत माहिती रोहित पवारांना कशी मिळाली ? त्यांनी अन्य काही यंत्रणा तर इथली खबर ठेवण्यासाठी केलेली नाही याची चौकशी व्हायला हवी …