पुणे : कोथरूड मध्ये प्रथम मतदानाचा हक्क बजवायला आलेले युवक ते ज्येष्ठांच्या नावे बोगस मतदानाच्या तक्रारी येत असताना आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द अरविंद शिंदे यांनी हा आरोप केला आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज् स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. परंतु तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी दिली गेली. परंतु त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते.
याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, “मी सकाळी ११ ते १२ दरम्यान सेंट मीराज् स्कूल मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. दरम्यान टेंडर व्होट सुविधेअंतर्गत मला मतदान करण्याची संधी दिली गेली आहे. परंतु त्या मताची गणना केली जाईल की नाही याबाबत शंका आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटणार आहे.”
कोथरूड च्या तक्रारी ..
दरम्यान एकीकडे भाजपच्या उमेदवाराने कोथरूड मधील ३५ हजार मतदारांची नावे वगळली गेल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी केली होती प्रत्यक्षात मात्र आपल्या नावावर मतदान झाल्याचे पाहून अनेकांना घरी परतावे लागत होते यातील काहीजण बोलत आणि निघून जात काहींनी मात्र हक्कासाठी ताकारारी करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसत होते .