पुणे: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरू झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळपासून पुण्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’ व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन , माणिकचंद ऑक्सिरिचच्या संचालिका जान्हवी धारीवाल बालन यांनी सकाळी 11 वाजता बुथ 11 कस्तुरबा गांधी विद्यालय म.न.पा. शाळा क्र. 39 कोरेगांव पार्क दक्षिण बाजूची इमारत खोली क्र. 4 (इंग्रजी माध्यमशाळा) येथे मतदान केले. यावेळी त्यांनी पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.
ख्यातनाम उद्योजक पुनीत बालन,जान्हवी बालन यांनी केले मतदानाचे आवाहन
Date: