शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान साहित्याचे वितरण

Date:

पुणे, दि.१२: शिरुर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहोचेल याची आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथून निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १८ टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ६८ बॅलेट युनिट, ३५६ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ५४ एस.टी.बस आणि २७ जीपची व्यवस्था करण्यात आली.

आंबेगांव विधानसभा मतदारसंघात शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द येथून निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. १७० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३४ टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार २० बॅलेट युनिट, ३४० कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ७२ एस.टी.बस आणि ५२ जीपची व्यवस्था करण्यात आली.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल तिन्हेवाडी, राजगुरुनगर येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २० टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार १५५ बॅलेट युनिट, ३८५ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ६४ एस.टी.बस आणि ८ जीपची व्यवस्था करण्यात आली.

शिरुर विधानसभा मतदारसंघात राज्य वखार महामंडळ गोदाम राजंणगाव येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ८० टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ३१७ बॅलेट युनिट, ४३९ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ७१ एस.टी.बस आणि ७ जीपची व्यवस्था करण्यात आली.

भोसरी विधानसभा मतदारसंघात घरकुल इडब्ल्युएस टाऊनहॉल, चिखली येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५० टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ४०४ बॅलेट युनिट, ४६८ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता ११५ एस.टी.बस आणि जीपची व्यवस्था करण्यात आली.

हडपसर विधानसभा मतदारसंघात साधना शैक्षणिक संकुल माळवाडी हडपसर येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. १८० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५१ टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले. १ हजार ५६३ बॅलेट युनिट, ५२१ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता १०६ एस.टी.बस आणि २२ जीपची व्यवस्था करण्यात आली.

२ हजार ५०९ मतदान केंद्रांवर होणार मतदान
शिरुर लोकसभा मतदारसंघात २ हजार ५०९ मतदान केंद्रे असून यामध्ये १ हजार १८९ मतदान केंद्र शहरी भागात तर १ हजार ३२० मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. ४८० ठिकाणी एकल मतदान केंद्र, २२२ ठिकाणी दोन मतदान केंद्र, ८७ ठिकाणी तीन मतदान केंद्र, ५९ ठिकाणी चार मतदान केंद्र, ३६ ठिकाणी पाच मतदान केंद्र, २७ ठिकाणी सहा मतदान केंद्र तर ७० ठिकाणी सहापेक्षा अधिक मतदान केंद्रांची स्थापन करण्यात आली आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ३५६ मतदान केंद्र, आंबेगांव ३३८ मतदान केंद्र आणि २ सहाय्यकारी मतदान केंद्र. खेड आळंदी ३८५ मतदान केंद्र, शिरुर ४०५ मतदान केंद्र आणि ३४ सहाय्यकारी मतदान केंद्र, भोसरी ४६४ मतदान केंद्र आणि ४ सहाय्यकारी मतदान केंद्र, तर हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ४९४ मतदान केंद्र आणि २७ सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत.

१ हजार २६८ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग
शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजार २६८ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सुरु असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. यामध्ये जुन्नर १७९, आंबेगाव १८०, खेड आळंदी १९३, शिरुर २२०, भोसरी २३५ आणि हडपसर २६१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या नियंत्रण कक्षातून या यंत्रणेद्वारे मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदार संघात २५ लाख ३९ हजार मतदार
शिरुर लोकसभा मतदारसंघात २५ लाख ३९ हजार ७०२ मतदार आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात ३ लाख १२ हजार २०५, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख २ हजार १०१ मतदार, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५२ हजार ६३४ मतदार, शिरुर विधानसभा मतदारसंघात ४ लाख ३९ हजार २७६ मतदार, भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ५१ हजार ५८२ मतदार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ८१ हजार ९०४ मतदार आहेत.

अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी- शिरुर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आले असून बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या १३ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे.
०००
[17:11, 12/05/2024] Karpe Dio Office: निवडणूक निरिक्षकांनी केली आंबेगाव येथील मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी

पुणे,दि.१२ :- विशेष निवडणूक निरिक्षक धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलिस निरिक्षक एन.के.मिश्रा यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन अवसरी येथील मतदान साहित्य वितरण केंद्राला भेट देऊन तेथील नियोजनाची पाहणी केली.

निवडणूक निरिक्षकांनी यावेळी विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दिव्यांग मतदान केंद्र पथकांशी बोलताना त्यांनी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी दाखविलेली सकारात्मकता आणि आत्मविश्वास याची प्रशंसा केली. मतदान प्रक्रियेसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पथकांना साहित्य वितरण करताना, निवडणूक प्रशासनाच्यावतीने तेथे करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

सहायक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संजय नागटिळक, नायब तहसीलदार श्री सचिन वाघ, सहायक प्रमिला वाळुंज आदी यांनी यावेळी निवडणूक शाखेने केलेल्या तयारीची माहिती निरिक्षकांना दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...