पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ?- रविंद्र धंगेकरांचा भाजपला सवाल

Date:

पुणे: पुणेकरांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी निवडून देवूनही पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? असा सवाल काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना केला. तेसच या प्रश्नाचे उत्तर पुणेकर मतदानाच्या माध्यमातून देतील आणि आपणास विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणुक धनशक्ती विरुद्ध जणशक्तीची असून पुढील दोन दिवसात पुण्यात पैशाचा पाऊस पडेल. यावर प्रशासनाने योग्य ते प्रतिबंधनात्मक उपाय करावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा ईशाराही धंगेकर यांनी दिला.

पुणे लोकसभा मतदार संघाचे  महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभाप्रसंगी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे आमदार विकास ठाकरे, निवडणुक प्रमुख मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, दीप्ती चवधरी, पूजा आनंद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, अमीर शेख, माध्यम समन्वयक राज अंबिके, आदींसह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते.

धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रा, मेळावा, सभांना पुणेकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ मी पिंजून काढला आहे. गेल्या तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने पुण्याचे प्रश्न मी जाणतो. सर्वांना सोबत घेवून मी सामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मोदींच्या कारभारामुळे नागरिकांचे जगणे मुश्कील  झाले आहे. गेल्या दहा वर्षात पुण्याच्या विकासाला खिळ का बसली, हे पुणेकर या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला विचारतील आणि महाविकास आघाडीला विजयी करतील. पुणे धार्मिक सलोख्याचे शहर आहे, ही परंपरा मी कायम राखणार आहे.

वंचित व एमआयएम भाजपची बी टीम असून ही निवडणुक पुणेकरांनी हातात घेतली आहे. भाजप पैसे देवून सभांना गर्दी करत होते. आज व उद्या भाजपचे लोक पैशाचा महापूर आणतील, दमदाटी करतील, पोलिसांनी यावर निर्बंध आणावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.

माझी ही दहावी निवडणुक आहे, माझ्या पहिल्या निवडणुकीपासून सोबत असलेले लोक आजही सोबत आहेत. मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. भाजपने काय विकास केला, हे काल राज ठाकरे सभेत बोलले आहे. ते पुण्याच्या विकासावर बोलले, त्यांचा रोख भाजपकडे होता. या सभेत त्यांनी कमळाला मत द्या, असे एकदाही म्हंटले नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.

प्रचाराची सांगता आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघात रॅली काढून केली. संविधान टिकवण्यासाठी आम्ही सदैव उभे राहू आणि या निवडणुकीत चांगल्या मताने निवडून येऊ, असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला.

मोहन जोशी म्हणाले, निवडणुक सुरू झाल्यापासून 37 पदयात्रा, कॉर्नर सभा घेवून काँग्रेसचा न्यायनामा घरोघरी पोहचवला आहे. महागाई व बेरोजगारीमुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे. दहा वर्षात केलेले एक काम भाजप नेत्यांना सांगता येत नाही. पक्ष फोडले, हे जनतेला आवडलेले नाही. भाजपची ताकद कागदावरच आहे, हे प्रचारावरून पुढे आले आहे. ज्या दिवशी कसबा पोटनिवडणुक जिंकली, तेव्हाच लोकसभेचा गड काँग्रेस जिंकणार हे निश्चित झाले होते. या निवडणुकीत प्रचाराची पातळी आम्ही राखली, कमरेखालचे आरोप केले नाहीत. याउलट भाजपने खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. भाजपची बी टीम असलेल्या वंचित व एमआयएमचा कोणताही परिणाम पुणेकरांवर व निवडणुकीवर होणार नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी रेसकोर्स मैदान संरक्षण खात्याकडे मागितले होते, त्यावेळी त्यांनी आम्ही राजकीय पक्षांना मैदान देत नाही, असे लेखी दिले. त्यानंतर आचारसंहिता असतानाही संरक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी रेसकोर्स मैदान दिले. मोदींच्या सभेनंतर पुन्हा भाजपला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घ्यावी लागली. यातच भाजपचा पराभव स्पष्ट होतो.

उल्हास पवार म्हणाले, ही निवडणुक हिंदु मुस्लिम मुद्द्यावर आली, एका मतदार संघात मतदान सुरू असताना शेजारच्या मतदार संघात पंतप्रधान सभा घेतात, यातच मोदी व भाजपचा पराभव होणार हे स्पष्ट होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांवरील कारवाई अन्यायकारकच

लोक जनशक्ती पक्षाची पुणे महापालिका आयुक्तांकडे मागणी पुणे : एकीकडे महापौरांनी गणेश...

दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; पीजीमध्ये विद्यार्थी अडकल्याची भीती

सत्य निकेतन परिसरातील दुर्घटना; तिघांना वाचवले, अरुंद गल्लीमुळे बचावकार्यात...

महापारेषणच्या यंत्रणेतील बिघाडाचा महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम

बहुतांश भागाचा वीजपुरवठा पूर्ववत पुणे : महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (दि. ६) दुपारी सुमारे १२.२५ वाजता तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, या बिघाडाचा परिणाम महावितरणच्या वीजपुरवठ्यावर झाला. महावितरणने उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून बहुतांश प्रभावित भागाचा वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात यश मिळविले. चिंचवड उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी व ब्रेकरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याने महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांवर परिणाम झाला. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे आदी भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच शिवाजीनगर, औंध व गणेशखिंड भागातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला. महापारेषणकडून बिघाड झालेला भाग बंद ठेवून उर्वरित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे, महावितरणकडून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात यश मिळाले. शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठाही काही काळ खंडित चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या रहाटणी व गणेशखिंड १३२ केव्ही वाहिनीवर परिणाम झाल्याने शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी भागांतील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. दुपारी १२.२५ वाजता खंडित झालेला या भागातील वीजपुरवठा सुमारे १.५० वाजता पूर्ववत करण्यात आला. गणेशखिंड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून पुणे मेट्रोलाही वीजपुरवठा होतो. या वीजपुरवठ्यावरही काही काळ परिणाम झाला होता. बाधित ग्राहकसंख्या महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील बिघाडामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील सुमारे २ लाख ६० हजार ग्राहक, तर शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहक, अशा एकूण सुमारे ३ लाख १० हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. निगडी परिसरातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना विलंब महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देऊन बहुतांश भागातील वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत केला. मात्र निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे, वाकड आदी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास काहीसा विलंब होत आहे. या भागातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. आंबेठाण व तळेगावलाही फटका चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्रातील बिघाडाचा फटका आंबेठाण (चाकण) व तळेगाव १३२ उपकेंद्रांनाही बसला. महावितरणने तळेगाव शहराचा वीजपुरवठा खोपोलीतून पर्यायी लाईनद्वारे पूर्ववत करुन घरगुती ग्राहकांना दिलासा दिला. मात्र औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा तांत्रिक मर्यादा आल्या. तर आंबेठाण उपकेंद्राचा १२.२५ वाजता बंद झालेला वीजपुरवठा दुपारी ४.२० वाजता सुरळीत झाला. अंदाजे दीड हजार उद्योगांना याची झळ बसली. महावितरणकडून प्रभावी नियोजन महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेतील बिघाडामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असला, तरी महावितरणने उपलब्ध पर्यायी व्यवस्थेचा प्रभावी वापर करून बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. उर्वरित प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला:डीजेवर बंदी घालणे योग्यच, – मेघना बोर्डीकर

धाराशिव-सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह...