जे नेते आपल्या कामाने निवडून येत नाही, ते जातीच्या ढाली पुढे करतात- नितीन गडकरी
पुणे- सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा नाहीये , जर इंदिरा गांधी धर्मनिरपेक्ष होत्या तर त्यांच्या मृत्यू नंतर ब्राम्हण बोलावून मंत्राग्नी कशाला दिला ? धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असाच आहे आणि असे राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केले , महात्मा फुलेंना हि समतेचे असेच राष्ट्र अपेक्षित होते असे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मी नागपूरमधून लाखाे मतांनी निवडून येईल कारण मी काेणती जातपात धर्म मानत नाही. भूकमारी देशातील प्रमुख समस्या आहे. जे नेते आपल्या कामाने निवडून येत नाही, ते जातीच्या ढाली पुढे करतात. सर्व जातीधर्माच्या लाेकांनी मला भरभरुन मते दिली आहे. समाजातील अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे भाजपचा विचार आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
पुणे लाेकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ यांचे प्रचारार्थ आयाेजित जाहीतर सभेत ते नातूबाग याठिकाणी बाेलत हाेते. नितीन गडकरी म्हणाले, पुण्यात अडीच हजार काेटी रुपये मुठा-मुठा नदी सुशाेभीकरण करण्यास मंजुर करण्यात आले. मेट्राे, रिंग राेड, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता इलेक्ट्रिक बसेस व्यवस्था करण्यात आली.
नितीन गडकरी म्हणाले की, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे संकल्पनेतील राज्य चालविण्याचे काम आम्ही करत आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्म समभाव अर्थ आहे परंतु आता ते धर्मनिरपेक्ष सांगतात. शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावचे मूर्तिमंत उदाहारण हाते त्यांन कधी एक मशीद ताेडली नाही. काँग्रेसचा सेक्युलरवाद हा संकुचित आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली सामाजिक समरसता प्रस्थापित करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेसने जे मागील 60 वर्षात काम सत्तेत असताना केले नाही ते आम्ही मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे नेतृत्वात केले. काँग्रेसची विचारधारा, समाजवादी विचारधारा व मार्क्सवादी विचारधारा देशात पूर्वी हाेती. जगात कम्युनिस्ट विचारधारा चीन, रशिया, हंगेरी मधून संपुष्टात आली आहे. राज्यात देखील माेठे सामाजिक नेते हाेते परंतु आता ते देखील संपले आहे. स्वतंत्र पार्टी देखील देशात संपलेली आहे. त्यामुळे भारताचे भविष्य देशात काेणत्या विचारधारेचे लाेक सत्तेत येणार यावर अवलंबून आहे. सर्वसामान्य लाेकांसाठी काम करणारे आम्ही असून गाेरगरीब जनतेस न्याय मिळवून देण्याचे काम केले जात आहे. दहा वर्षात 25 काेटी लाेक गरीबीतून बाहेर काढण्यात आले आहे. पुढील दहा वर्षात देशात गरीब काेण राहणार नाही, सर्वांना काम मिळेल.
नितीन गडकरी म्हणाले की, काँग्रेसकडे विकासाचे मुद्द्यावर बाेलण्यासारखे काही नाही. त्यामुळे संविधान धाेक्यात येणार असा अपप्रचार केला जात आहे. संविधानाचे मूलभूत तत्वे देशात काेणतेही सरकार आले तर ते काेणालाही बदलता येत नाही अशाप्रकारचा निर्णय सर्वाच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात दिला आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात घटनेची इतकी माेडताेड केली की ती उध्दवस्त केली. काँग्रेसने 60 वर्षात 80 वेळा घटनेची माेडताेड केली व आमच्यावर आराेप करतात की 400 पार आम्ही निवडून आल्यास संविधान बदलणार. मी स्वप्न दाखवणारा नेता नसून जे बाेलताे ते करताे.