पुणे- सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणूनच आपण दिल्लीत हि पुण्याचा आवाज गाजवू अशी ग्वाही येथे पुणे लोकसभेचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली.
आज पुणे लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पुणे लोकसभा क्षेत्रामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री विश्वजीत कदम चंद्रकांत मोकाटे, माढा लोकसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धंगेकर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत धंगेकर यांनी कसबा, शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगांव शेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच रॅलीदरम्यान श्रीगणेश, महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.