तब्बल 200 हून अधिक ‘मैत्रिणी’ किलबिलाट आणि चिवचिवाट करत सकाळी 11 वाजता शाळेत जमा झाल्या .त्यांच्याबरोबरच हडपसर पासून दूर असलेल्या परदेशात असणाऱ्या 16 जणी श्रुती आबनावे हिने तयार केलेल्या झूम मीटिंग द्वारे शाळेत पोहोचल्या अन शाळेत पाऊल टाकताच मधली 19 वर्ष जणू नाहीशी झाली.
शाळेतले ते दिवस तो वर्ग ती घंटा ते शिक्षक त्या शिक्षिका यामुळे काही काळापुरते का होईना पण जुन्या दिवसांची एक छोटीशी परंतु अविस्मरणीय सफर अनुभवता आली.
अगदी स्नेहसंमेलनाला असते तीच लगबग, तशीच धांदल, तीच उत्सुकता आणि त्याच सगळ्या विद्यार्थिनी….. निमित्त होते साधना कन्या विद्यालयात आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याचे…….
या कार्यक्रमाकरिता सुजाता कालेकर मुख्याध्यापिका साधना कन्या ,माजी मुख्याध्यापिका इंदिरा गिरे , शशिकला साळुंखे , संजीवनी शिंदे, विजय शितोळे दिलीप मोहिते , सुभाष दळवी, दत्तात्रय मांगडे प्रद्युम्न उपाध्ये, दादासाहेब सूर्यवंशी, सुनील झिरपे, नारायण व्यवहारे, देविदास गाताडे, संजय गोसावी, कुसुम चांदणेकर, विनया कोठावळे, मीनाक्षी वायदंडे, विमल ठिगळे, आसावरी वाल्हेकर, प्रतिभा डोके, सुषमा तांबे, मंदाकिनी कानडे, संगीता दीक्षित, सुमन होले, अंजली चौधरी, छाया कुंभार, सुमन गावडे, स्वलिया पठाण, नीलांगी सोनवणे यांची प्रार्थनीय उपस्थिती कार्यक्रमास लाभली.कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील तथा वहिनी यांना वंदन करून झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर ,विठ्ठल तुळजापुरे ,मंदाकिनी शिंदे ,छाया पवार, वसुंधरा तुपे अनुराधा गेजगे , शुभांगी नवगण यांनी केले. विद्यार्थिनी नियोजन कमिटी मध्ये विनंती नहार, रेश्मा माने, भाग्यश्री कोद्रे, स्नेहा पोतदार ,अंकिता वाडकर, दीपश्री जाधव, मयुरी वाघोले, मधुरा दौंडकर ,मधुरा सहस्रबुद्धे ,श्रुती आबनावे ,पल्लवी टेंभुर्णीकर ,शितल घुले, मयुरी वाघोले, प्रणाली ससाणे,सोनाली खताळ ,स्नेहल भोसले ,गौरी जाधव ,रेश्मा आबनावे, अर्चना शिरसागर….. यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
शाळेत जमल्यावर शिक्षकांचे मार्गदर्शन हवेच ना! शशिकला साळुंखे, इंदिरा गिरे ,कुसुम चांदणेकर ,स्वालिया पठाण, वसुंधरा तुपे या शिक्षकांच्या मार्गदर्शनपर शब्दांनी नवीन ऊर्जा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपश्री जाधव व आभार अंकिता वाडकर या विद्यार्थिनीने मानले. आपल्या हडपसरचे आमदार चेतन तुपे, दिलीप तुपे ,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी ,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार यांच्या शुभेच्छा कार्यक्रमास लाभल्या.