महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त १०० शंखनादांची मानवंदना

Date:

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
पुणे : हिंदू वीरशैव लिंगायत मंच यांच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त १०० शंखनादांची मानवंदना देण्यात आली. दिनांक १० मे रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच श्री श्री श्री जगद्गुरु  एकोरामाराध्य आणि चैत्रशुद्ध पंचमीला श्री श्री जगद्गुरु मरुळाराध्य यांचा प्रकट दिन अशा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून १०० शंखांचा शंख नाद करून महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक रवी कल्याणे यांनी महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लेखिका डॉ. शामा घोणसे,  समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी ,स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने, वीरशैव लिंगायत समाज पुणे शहर सचिव किशोर कडेकर, महेश कुगावकर उपस्थित होते. 
हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे शरद गंजीवाले, पुणे महानगर संयोजक अतुल सरडे, ऍड. वैजनाथ विंचुरकर, आशिष हिंगमिरे आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. केशव शंखनाद पथकाने यावेळी शंखनाद केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे विमानतळाचेजुने टर्मिनल नव्या स्वरूपात लवकरच पुणेकरांच्या सेवेत : मुरलीधर मोहोळ

जुन्या टर्मिनलला एकच परवानगी बाकी पुणे (प्रतिनिधी) : पुणे विमानतळाच्या...

कात्रज कोंढवा रस्त्यावरील शाळकरी मुलीच्या अपघाती मृत्यूने विरोधक संतप्त

पुणे- कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू...

कात्रज-कोंढवा रस्ता आणखी किती बळी घेणार ; मुख्यसभेत विरोधी पक्षनेते निलेश निकम आक्रमक

वारंवार होणाऱ्या अपघातांवरून प्रशासनाला जाब; रस्त्याचे रखडलेले काम आणि...