पुणे- काल गुरुवार दि. 9 मे रोजी सायं 5 वाजता भारती विद्यापीठ समोर, ममता चौक, बालेवाडी हायस्ट्रीट, बालेवाडी येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांच्या वतीने होत असलेल्या विकासकामांचे कौतुक करून जनतेसाठी सुरू केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून समस्त नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील ही सदिच्छा व्यक्त केली. विविध मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली याबद्दल नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी, युवावर्ग, मित्रपरिवार, परिसरातील विविध सोसायटींमधील नागरिक तसेच बाणेर- बालेवाडी- सुस- म्हाळुंगे- पाषाण- सोमेश्वरवाडी- औंध मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.