विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये गरजू मुलींकरिता प्रवेश सुरु

Date:

पुणे: विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात मुलींसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनी ज्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश घेतला आहे, अशाच विद्यार्थिनींनी या टप्प्यात अर्ज करावेत, असे समिती व्यवस्थापनाने कळविले आहे. 
पुण्यात मुलींसाठी नवे वसतिगृह बांधले आहे. तेथे ३३६ मुलींची व्यवस्था वाढणार आहे. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थिनी सध्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यापुढील वर्गात पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत आणि त्यांची निवास, भोजनाची अडचण आहे, अशांना समितीच्या वेबसाईटवर (www.samiti.org) जाऊन प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येतील. अर्जाची छाननी होऊन मुलाखतीनंतर प्रवेश निश्चित केले जातील. 
समितीचे कार्य केवळ समाजाच्या मदतीवर ६९ वर्षे सुरू असून, सध्या पाच वसतिगृहांतून ७५० मुला-मुलींसाठी व्यवस्था उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील मुलींचे पुण्यात शिक्षणाला येण्याचे प्रमाण वाढल्याने अजून एका वसतिगृहाची उभारणी केल्यामुळे ही संख्या सुमारे ११०० होणार आहे. केवळ कमी खर्चात निवास, भोजनाची सुविधा पुरविणे एवढाच समितीचा हेतू नसून, युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून समिती काम करते, असे संस्थेने कळवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप होत शांतता, एकता आणि प्रगतीचे दूत व्हा : लोसी दिखो

सरहदतर्फे स्व. श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि...

युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम

पुणे | प्रतिनिधी समाजात शांतता, सुरक्षितता आणि नागरिक व पोलीस...

धर्म हा सरकारच्या नियंत्रणाखाली वा सरकारच्या परमिशनचा विषय नाही-कायद्याविरोधात हायकोर्टात लढणार- प्रकाश आंबेडकर

मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद...