तुम्ही वेड्यासारखे आरोप करता रे..तुमच्या हातात मिडिया म्हणून ..

Date:

माझ्याजवळ माझी आई आहे …सारे कुटुंब आपल्याबरोबर आहे असे ते दाखवतात

आपल्याबरोबर सारे कुटुंब आहे असे ते दाखवितात पण पवार कुटुंबात सर्वात वयस्क असलेली माझी आई माझ्याबरोबर आहे याची नोंद घ्यावी असेही अजित पवार म्हणालेत .

बारामती – रोहित पवारांनी अजित पवार पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप करत काही व्हिडीओ समज माध्यमांवर टाकले आहेत या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार माध्यम प्रतिनिधींना म्हणाले,’तुम्ही वेड्यासारखे आरोप करत आहात ,तुम्ही बघितले काय ?उगीच तुमच्या हातात मिडिया आहे म्हणून काहीही काय ,ज्यांनी आरोप केलेत त्यांच्यावर परिणाम झालेले आहेत ,असल्या बगलबच्च्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. बारामती मतदारसंघात विरोधकांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यांच्या या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर काटेवाडीत माध्यमांशी ते बोलत होते.यावेळी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ”सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी तसे करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपांना माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही”, अशी टीका अजित पवारांनी केली आहेयाशिवाय बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, ”हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही”, असे हल्ला त्यांनी रोहित पवारांवर चढवला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीरा’ला पुण्यात आज प्रारंभ

आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती पुणे : आरोग्य सेवांच्या डिजिटल...

राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा: नसीम खान

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणी केली नाही तर...