पुणे-पहाटेचा शपथविधी पक्षधोरणाचा भाग नव्हता. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची मते मागितली नव्हती. त्यांनी निवडलेला रस्ता म्हणजे लोकांची फसवणूक आहे, असे म्हणत शरद पवार यांनी शनिवारी अजित पवारांच्या गौप्यस्फोटांना उत्तर दिले.अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत येथील शिबिरात शरद पवारांवर घणाघाती आरोप केले. शरद पवारांनीच मला सत्तेत जाण्यास सांगितले. मात्र, ऐनवेळी राजीनामा देऊन मागे घेतला. ही त्यांची धरसोड वृत्ती असल्याचे टिपण्णी केली. मात्र, अजित पवार असत्य बोलत होते. आम्हाला भाजपसोबत जायचे नव्हते. तो त्यांचा निर्णय असल्याचे उत्तरही शरद पवारांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणाले, त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. ज्या मागण्या केल्या होत्या त्या संबंधीची चर्चा झाली होती. मात्र, तो रस्ता आम्हाला मान्य नव्हता. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची मते मागितली नव्हती. जी आमची भूमिका होती त्याला लोकांचा पाठिंबा होता. त्यांनी निवडलेला रस्ता म्हणजे लोकांची फसवणूक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती, भाजप बरोबर जायचे नव्हते. भाजपसोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. मी राजीनामा देण्याचे कारण काय होते? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. भाजपसोबत जायचे ही ही आमची भूमिका होती. ज्यांना जायचे होते ते त्यांच्यासोबत गेले. मी त्यांना कधीच बोलावले नाही.
शरद पवार म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झाला होता. भाजपबरोबर जायला नको ही स्पष्ट भूमिका होती. मला आनंद परांजपे किंवा जितेंद्र आव्हाडांची मदत घेण्याची गरज नाही. माझी स्वत:ची निर्णय घेण्याची कुवत आहे. लोकांच्या समोर जायचे असेल तर लोक जी भूमिका घेतील ती मान्य करावी लागेल. काहीही स्टेटमेंट केले त्याचा स्वीकार मी का करायचा? त्यांनी राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, फक्त त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितले. त्याच्याशी विसंगत भूमिका त्यांनी घेतली आहे.