Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – डॉ. संजय तलबार

Date:

पीसीसीओईआर मध्ये राज्यस्तरीय ‘टेक्नोवेट-२०२४’ स्पर्धा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २० एप्रिल २०२४) – आजच्या स्पर्धात्मक जगात, विद्यार्थ्यांनी प्रगत शिक्षणावर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग सारख्या साधनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. उच्च तंत्रज्ञानामुळे साधने कितीही वाढली, विकसित झाली तरी निरंतर शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मत डॉ. संजय तलबार यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये ‘टेक्नोवेट-२०२४’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
टेक्नोवेट २०२४ मध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित बीजीएमआय-व्हॅलोरंट, कॅड ओ क्रिएट, फास्ट अँड फ्यूरियस, आयपीएल लिलाव, एम यू एन, शार्क टॅंक, टेक-संगम एस्केप रूम, ब्रो कोड, ट्रेझर हंट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांतील ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. याचा बक्षीस वितरण समारंभ संजय तलबार यांच्या हस्ते पार पडला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी स्वागत केले. डॉ. सुशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संतोष रणदिवे आणि डॉ. सुशांत वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विविध संस्थांचे विद्यार्थी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...