मुंबई, 1 डिसेंबर, 2023: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी (रु. 2 कोटी आणि त्याहून अधिक ते १० कोटींपेक्षा कमी) त्यांच्या मुदत ठेवींचे व्याज दर वाढवले आहेत. यासाठी “46 दिवस ते 1 वर्षापर्यंत”चा कालावधी आहे. 1 डिसेंबर 2023 पासून हे दर लागू होतील.
बँकेने कमी कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत, म्हणजे 46 दिवस ते 90 दिवस कालावधीसाठी 5.25%, 91 दिवस ते 179 दिवस कालावधीसाठी 6.00%, 180 दिवस ते 210 दिवस कालावधीसाठी 6.25%, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.50% आणि 1 वर्षासाठी 7.25%. बँकेने दिलेला सध्याचा व्याजदर स्पर्धात्मक आहे, HNIs, लघु आणि मध्यम कॉर्पोरेट्स, NRIs आणि व्यावसायिक स्वयंरोजगार इत्यादींकडून गुंतवणूकीसाठी अतिशय आकर्षक परतावा देत आहेत.
1 नोव्हेंबर 23 पासून बँकेने 2 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या सर्व ठेवींचे दर आधीच वाढवले आहेत. सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 7.90%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75% आणि इतरांसाठी 2 वर्षांच्या मुदतीसाठी 7.25% पर्यंतचा सर्वोच्च व्याज दर देत आहे. सुधारित व्याजदर देशांतर्गत, NRO आणि NRE रुपया मुदत ठेवींसाठी लागू आहेत.