पुणे –
पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व समन्वयक अरविंद शिंदे, उमेदवार रवींद्र धंगेकर आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार व प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, माध्यम समन्वयक प्रवीण प्र वाळिंबे व राज अंबिके, सुधाकरन पणीकर, विनोद निनारीया, दीपक निनारीया तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
या प्रेस रूम मधून रोज सर्व प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडिया यांना दरोजच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे मेळावे, पदयात्रा, जाहीर सभा, कोपरा सभा, पत्रकार परिषदा, आदीच्या बातम्या व फोटो पाठवले जाणार आहेत.