पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ग्रंथालय विभाग, पुणे, शहराध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सौ.जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला आघाडीच्या चिटणीस,सरचिटणीस आणि उपाध्यक्ष या पदांवर सौ.जाधव यांनी काम केले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.आता पक्षाच्या ग्रंथालय विभागाचे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाच्या कामातही ठसा उमटवेन, असे सौ.प्राजक्ता जाधव यांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना सांगितले.