पुणे, दि.३ एप्रिल : तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये यांना पहिला तनुश्री ‘जन संस्कार पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत न्यू सांगवी येथील साई चौक स्थित संस्कृती लॉन्स मध्ये होणार आहे. अशी माहिती तनुश्री गर्भसंस्कार परिवाराचे संस्थापक डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री. कांतीलाल मुनोत हे उपस्थित होते.
डॉ. अनिल गुगळे यांनी सांगितले की, डॉ. संजय उपाध्ये हे ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीचे कार्य करीत आहेत. आपल्या प्रबोधनातून समाज मनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ज्या पद्धतीने आमची संस्था ही सतत गर्भवती महिलांसाठी उत्तम संस्कार देऊन नव पीढी घडविण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळेच आम्ही या वर्षापासून तनुश्री ‘जन संस्कार पुरस्कार’ देण्याची घोषणा केली आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या, तनुश्री स्नेहमेळाव्याचे हे ११ वर्ष आहे. तनुश्री संस्कार स्नेह मेळावा तर्फे आयोजित तनुश्री सूरसंगमच्या गर्भवती महिलांसाठी सकारात्मक जीवन शैली या विषयांमध्ये डॉ. संजय उपाध्ये-मन करा रे प्रसन्न व तनुश्री जन संस्कार पुरस्कार, डॉ. अनुप भारती- मोबाईलचे मालक का गुलाम, डॉ. यश वेलणकर-नाते तुझे माझे, वैद्य सुविनय दामले-या हदयी ते त्या हदयी , डॉ भाग्यश्री कश्यप यांचे सूत्र संचलन आणि हिमांश बक्षी-सुरेल बासुरी साथ असेल. मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडतील.
गर्भवती महिलांना त्यांचे अंतर्गत सामर्थ्य जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. पूर्वी स्त्रीला एकत्र कुटुंब पद्धतीत मार्गदर्शन मिळत असे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ते मार्गदर्शन मिळत नाही. आपली श्रीमंत परंपरा पुनर्जीवित करण्यासाठी, माता व बालक यांच्यातील पवित्र नात्याचे संगोपन करण्यासाठी पालकांना अमूल्य मार्गदर्शन , तत्व शिकवून त्यांना सुजाण पालक बनवून दोन पिढीतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करणे हा या कार्यशाळेचा उद्देश्य आहे.
डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे हे गेल्या २५ वर्षापासून सांगवी येथे गर्भसंस्कार केंद्र यशस्वी रित्या चालवित आहेत. यांच्यातर्फे आयोजित गर्भसंस्कार कार्यक्रमात आतापर्यंत ५२०० पालकांनी सहभाग घेतला आहे. या मध्ये आईची शारीरिक, मानसिक आरोग्य वृध्दी व बाळ निरोगी, आनंदी व सुसंस्कारीत होण्यासाठी केली आहे. त्याचप्रमाणे तनुश्री ब्रम्ह मुहूर्त कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केेले जाते. गेल्या दोन वर्षापासून ९ हजार कुटुंबाने ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला.गर्भ संस्कार व सकारात्मक मनाद्वारे नितिमान पिढी निर्माण करण्यासाठी पालकांना मदत केल्या जाते.
इच्छुकांना सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी विनामूल्य पण आवश्यक आहे. नोंदणी साठी मो.नं.९११२२३१७१५, ८००७२३२०११, +९१ ९९७५२ ७१३७१ वर संपर्क साधावा.