महसूलवाढ, उत्कृष्ट ग्राहकसेवेसाठी विभागनिहाय नियोजन तयार करा

Date:

महावितरणचे संचालक अरविंद भादिकर यांचे निर्देश

पुणे, दि. ३१ मार्च २०२४: पुणे परिमंडल अंतर्गत अचूक वीजबिल व इतर उपाययोजनांमधून महसूलवाढ तसेच उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यासाठी विभागनिहाय नियोजन तयार करावे. सोबतच यापुढे कोणत्याही परिस्थितीत वीजबिलांच्या थकबाकीमध्ये वाढ खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने ‘शून्य थकबाकी’च्या उद्दिष्टानुसार कामकाज करावे असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर यांनी दिले.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात रविवारी (दि. ३१) संचालक श्री. भादिकर यांनी पुणे परिमंडलमधील वीजबिलांच्या थकबाकीसह इतर विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर म्हणाले की, पुणे परिमंडलामध्ये एकीकडे विजेची मागणी व वीजवापर वाढत आहे. त्याच प्रमाणात महसूलवाढ देखील होणे आवश्यक आहे. यासह प्रामुख्याने औद्योगिकसह इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी तात्काळ व उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने नियोजनाचा व अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करावा. येत्या काही दिवसांत या नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

महसूलवाढ व वीजबिल वसूलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग कार्यालयांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने (वडगाव शेरी), सचिन पाटील (गणेशखिंड) रामचंद्र लोंढे (फायरब्रिगेड), उमेश कवडे (पेशवेपार्क), भूजंग बाबर (खराळवाडी) तसेच सहायक अभियंता भरत पवार (कॅम्प शाखा), जनमित्र देविदास शिंदे, मंगेश घोडे व उमाकांत ढोले यांचा संचालक (संचालन) श्री. भादिकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

रास्तापेठ येथील ग्राहक सुविधा केंद्राला संचालक श्री. भादिकर यांनी भेट दिली. या केंद्रातून वीजग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या कार्यप्रणालीचा व प्रतिसादाचा आढावा घेत त्यांनी विविध सूचना दिल्या. तसेच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. ग्राहकसेवा, सौर ऊर्जा व इतर विषयांच्या प्रशिक्षणाच्या आयोजनांची संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर यांनी माहिती घेत समाधान व्यक्त केले.  

या बैठकीला अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, श्री. संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांच्यासह कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...