युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना हिने अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ” योद्धा ” मध्ये कमालीची मनोरंजक कामगिरी केली आहे. राशी ने विविध शैलींचा अभ्यास करून ही भूमिका साकारली आहे. राशी का ला योद्धा नंतर अजून ॲक्शनर्सचा भाग व्हायचे आहे असं सांगितलं आहे.
राशीची विशलिस्ट इथेच थांबत नाही कारण तिला पडद्यावर पौराणिक पात्र साकारायचे आहे. “बाहुबली मधील अनुष्का शेट्टीसारखी व्यक्तिरेखा साकारायला मला आवडेल. एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर राशी एक उत्तम अभिनेत्री आहे हे दाखवून दिल आहे.
अष्टपैलू अभिनेत्री कामाच्या आघाडीवर, सध्या अनेक मनोरंजक प्रकल्पांची वाट पाहत आहे. पॅन इंडियाचा युवा स्टार विक्रांत मॅसीसोबत ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानाई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील तिच्या श्रेयावर आहे.