पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार डॉ. श्री. राजेंद्र भोसले (भा. प्र.से) यांनी विक्रम कुमार (भा.प्र. से) यांचे कडून आज स्वीकारला. यावेळी विक्रम कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारल्या नंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त उपायुक्त,खातेप्रमुख, अधिकारी ह्यांच्या समवेत पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतचा संपूर्ण आढावा घेतला आणि पुणे शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात ठेवून त्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे , अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे , डॉ. कुणाल खेमणार , नगर अभियंता प्रशांत वाघमारे, सर्व उपायुक्त , सर्व खातेप्रमुख , महापालिका सहाय्यक आयुक्त, अधिकारी उपस्थित होते.