धुळे – पुण्याच्या पहिल्या महिला महापौर,आणि कॉंग्रेसच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेउन् त्यांच्याशी बोलताना महिला यावेळी खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त केला आणि पुण्यातून यावेळी कॉंग्रेसचाच खासदार होईल यासाठी आम्ही पुरेपूर मेहनतीने लोकापर्यंत पोहोचून आपण जाहीर केलेय ५ योजनांची माहिती देऊ असेही म्हटले आहे.या पाच हि योजनांबाबत त्यांनी राहुल गांधी यांचे आभार देखील मानले. कॉंग्रेसने देशाला खूप काही दिले आहे,घडविले आहे हे सांगताना आम्ही कसलीही कमतरता अगर उणीव भासू देणार नाही असेही त्या म्हणाल्या.त्यांच्या या वक्तव्याने राहुल गांधी यांनी त्यंना शुभेछ्या दिल्यात.
काँग्रेसने 5 योजना जाहीर केल्या…
1.महालक्ष्मी गॅरंटी : या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल.
2. अर्धी लोकसंख्या-पूर्ण हक्क : याअंतर्गत केंद्र सरकारच्या नवीन नियुक्त्यांमध्ये महिलांना निम्मे अधिकार मिळतील.
3. शक्तीचा सन्मान : या योजनेंतर्गत अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल.
4. अधिकार मैत्री: या अंतर्गत, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि आवश्यक मदत देण्यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये एक पॅरा-लीगल म्हणजेच कायदेशीर सहायक अधिकारी मित्र म्हणून नियुक्त केला जाईल.
5. सावित्रीबाई फुले वसतिगृह: सर्व जिल्हा मुख्यालयांत नोकरदार महिलांसाठी किमान एक वसतिगृह बांधले जाईल आणि या वसतिगृहांची संख्या संपूर्ण देशात दुप्पट केली जाईल.