ठाणे-कारागृहात दाखल बंद्यांना कारागृहातील नियमानुसार त्यांच्या कुटुंबियांशी/वकीलाशी संवाद होण्याकरीता मुलाखत, कॉईन बॉक्स, व्हिडीओ कॉन्फरन्स,गळाभेट इत्यादी सुविधा पुरविण्यात येत होत्या परंतू कारागृहात क्षमतेपेक्षा सरसरी पेक्षा जास्त बंदी दाखल असल्याने प्रचलित सुविधा देण्यात मर्यादा येत होत्या तसेच काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कारागृहातील सर्वांना बंद्यांना त्याच्या कुटुंबियांशी/वकीलाशी संवाद साधण्याकरीता यामध्ये सुधारणा होणे आवश्यक होते.याचा सर्वकक्ष बाबींचा आढावा घेऊन कारागृहमहानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील बंद्यांकरीता तमिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व कारागृहात दाखल बंद्यांकरीता तमिळनाडू स्थित ॲलन ग्रुप,कंपणीच्या सहाय्याने बंद्यांकरीता स्मार्टकार्ड सुविधा सुरु केली आहे.
दि.12.03.2024 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्याकरीता स्मार्टकार्ड दुरध्वनी सुविधा,वॉशिंग मशिन, दुरदर्शन संच,ई मुलाखत युनिट इत्यादीचे उदघाटन व आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड चे वितरण निवृत्त पोलीस महासंचालक, भारताचे सौदी अरेबियातील माजी राजदूतअहमद जावेद यांचे हस्ते व अमिताभ गुप्तायांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेले आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमाकरिता ,कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई व अधीक्षक,ठाणे मध्यवर्ती कारागृह राणी भोसले,आणि इतर अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्यसिथतीत सरासरी 4200 पुरुष बंदी व 133 महिला बंदी दाखल असून सर्व विभागातील बॅरेक च्या बाहेरील बाजूस ॲलन ग्रुप,कंपणी द्वारे 20 नग स्मार्टकार्ड दुरध्वनी संच बसविण्यात येऊन फोन सुविधे करीता आवश्यक स्मार्ट कार्ड पुरविण्यात आलेले आहे. स्मार्टकार्ड मध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचे एकूण 03 फोन क्रमांक जतन केलेले असतील त्या मोबाईल क्रमांकावरच बंदी स्मार्टकार्डद्वारे कॉल करु शकनार आहेत. स्मार्टकार्डच्या माध्यमातून ज्या बंद्यांच्या फोन नंबरची पडताळणी झालेली आहे,अशा सर्व बंद्यांना आठवडयातून तीनवेळा प्रत्येकी 06 मिनीटे देण्यात येणार असून सदर फोन सुविधेकरीता बंद्यांना प्रति मिनीट 01 रुपये प्रमाणे शुल्क ठेवण्यात आलेले आहे.स्मार्टफोन सुविधेमुळे बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकीलाशी संवाद साधण्यात सुलभता येऊन बंद्यांना निश्चित फायदा होणार आहे.त्याच प्रमाणे कारागृहातील बंद्यांना कपडे स्वच्छेकरीता मुख्यालयाकडुन बंद्यांचे स्वत:चे वापराचे कपडे धुण्यासाठी 05 नग वॉशिंग मशीन व कपडे सुकविण्याकरीता 05 ड्रायर मशीन पुरविण्यात आलेले आहेत. कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांचे मनोरंजनोकरीता टि.व्ही. सुविधेमध्ये दुरदर्शन चॅनेलशिवाय 4 वेगवेगळे स्पोर्ट चॅनेल तसेच मराठी /हिंदी /इंग्रजी बातम्यांचे प्रत्येकी चार चॅनेल तसेच ॲनिमल प्लॅनेट इ. चॅनेल सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे.त्यानुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहास,मुख्यालयाकडुन 75 इंची 03 नग , 50 इंच -15 नग, 43 इंची 10 नग टि.व्ही. व 55 इंची टि.व्ही. 10 नग इ. अशा एकूण 38 नग दुरदर्शन संच पुरवठा करण्यात आलेला आहे. ज्या बंद्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष भेटी करीता येऊ शकत नाही अशा बंद्यां करीता ई मुलाखत सुविधा सुरु करण्यात आलेली आहे, ई मुलाखत करीता 10 व्ही.सी.संच कार्यान्वयित करण्यात आलेले आहेत.सदर सुविधेमार्फत बंद्यांना नातेवाईक भेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
भारत सरकारची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कारागृहातील पात्र बंद्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत रुपये 05 लक्ष पर्यंत वैद्यकीय उपचार कवच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.सदर योजनेअंर्गत लाभार्थी बंद्यांना आयुष्मान भारत कार्ड चे वाटप करण्यात आले.
कामगार मंत्रालयांतर्गत श्रमिक कार्ड नोंदणी अंतर्गत कारागृहातील बंद्यांची नोंदणी करुन बंद्यांना कामगार मंत्रालयांतर्गत दोन लक्ष रुपयांचा अपघात विमाचा लाभ देण्यात येत आहे.या अतर्गत बंद्यांची नोंदणी करुन ई श्रम कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.