ठाकरे सरकारच्या काळात रिक्त झालेल्या १३ जागाही अद्याप रिक्तच
मुंबई –विधानपरिषदेचे दहा आमदार निवृत्त होणार आहेत. या आमदारांना आज सभागृहात निरोप दिला जाईल. विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहे. आज निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या 31 वर जाणार आहे.
गेली 2 दिवस विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा सरकारने 8 लाख कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आहे. 2022-23 साली हे कर्ज 6 लाख 29 हजार कोटी एवढे होते. आता पुढच्या वर्षापर्यंत आपण हे कर्ज 8 लाख कोटींपर्यंत न्यायचे ठरवले आहे. हे कर्ज कसे फेडायचे हा आमचा प्रश्न आहे. पण तुम्ही आपल्याला 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे, असे सांगता, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्याच्या डोक्यावरील कर्जावरून सरकारवर टीका केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार आहे. आज विधानपरिषदेतील मे आणि जून या महिन्यात कार्यकाळ संपत आलेल्या 10 विधानपरिषदेतील आमदारांचा सायंकाळी 5 वाजता निरोप सभारंभ कार्यक्रम असणार आहे. विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.