टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशनमध्ये मित्सुबिशी सुरुवातीला ३०० कोटी रुपये गुंतवेल
नव्या वाहनांची विक्री, व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस बिझनेस मॉडेल्स, ऑपरेटिंग सोल्युशन्स इत्यादी टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन पुरवेल.
चेन्नई, १९ फेब्रुवारी २०२४: टीव्हीएस मोबिलिटी (टी व्ही सुंदरम अयंगार अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडपासून वेगळी झालेली कंपनी) या भारतातील ऑटोमोटिव्ह डिस्ट्रिब्युशन आणि आफ्टरमार्केट उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने भारतात सुट्या भागांचे उत्पादन आणि एकात्मिक आफ्टरमार्केट प्लॅटफॉर्म उभारला आहे. आज टीव्हीएस मोबिलिटीने तब्बल १७०० समूह कंपन्यांचे नेटवर्क असलेल्या, जागतिक पातळीवरील एकात्मिक व्यवसाय, जपानी उद्योगसमूह मित्सुबिशी कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. भारतात सर्वसमावेशक व्हेईकल मोबिलिटी इकोसिस्टिम स्थापन करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे.यामुळे टीव्हीएस मोबिलिटीचा डीलरशिप बिझनेस टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन (टीव्हीएस व्हीएमएस) बनेल. आपल्या ग्राहकांना सेवांचा परिपूर्ण पोर्टफोलिओ प्रस्तुत करून हा व्यवसाय भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल. संबंधित नियामक अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल.
सुरुवातीला मित्सुबिशी कॉर्पोरेशन ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. दोन्ही पक्ष या भागीदारीच्या वृद्धीला पाठिंबा देण्यासाठी बांधील राहतील. पॅसेंजर कार, कमर्शियल व्हेइकल्स आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (MHE) मधील वाहनांच्या मालकीसंदर्भातील दोन्ही पक्षांच्या व्हिजनला चालना देण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांमध्ये २ बिलियन डॉलर्सचा रेव्हेन्यू मिळवण्याची क्षमता या बिझनेस मॉडेलमध्ये असेल.
टीव्हीएस मोबिलिटीचे डायरेक्टर श्री आर दिनेश यांनी सांगितले, “टीव्हीएस मोबिलिटीने भारतात आपल्या डीलरशिप व्यवसायामार्फत वाहनांची विक्री, सेवा आणि वितरण यामध्ये आघाडी मिळवली. मित्सुबिशी कॉर्पोरेशनसबत भागीदारी टीव्हीएसला संपूर्ण व्हेईकल मोबिलिटी इकोसिस्टिमला विविध सेवा सुविधा पुरण्यासाठी सक्षम बनवेल.”
त्यांनी पुढे सांगितले, “स्वतंत्र आफ्टरमार्केटसाठी एकात्मिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स पुरवल्यानंतर व्हेईकल मोबिलिटी बिझनेस आमच्या सर्व व्यावसायिक, कॉर्पोरेट आणि फ्लीट मालक ग्राहकांना अभिनव व डिजिटली सक्षम सुविधा पुरवेल आणि वाहनांची विक्री, वाहनांचे संचालन व व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस सॉल्युशन्समध्ये एकात्मिक सेवासुविधा पुरवण्यासाठी वाहन उत्पादकांसोबत आमच्या भागीदारीचा विस्तार करता येईल. सर्व हितधारकांना सेवासुविधा पुरवण्यासाठी इतर हितधारकांसोबत देखील ही भागीदारी काम करेल.”
या गुंतवणुकीबरोबरीनेच मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या जागतिक अनुभवाचा फायदा देखील या भागीदारीला मिळेल. बिझनेस मॉडेल अधिक वेगाने वृद्धिंगत व्हावे यासाठी मित्सुबिशी कॉर्पोरेशन आपल्या सर्वोत्तम प्रथा देखील यामध्ये शेयर करेल.
मित्सुबिशी कॉर्पोरेशनमध्ये ऑटोमोटिव्ह अँड मोबिलिटी ग्रुपचे सीईओ श्री शिगेरु वाकाबायाशी यांनी सांगितले, “नवीन ऑटोमोबाइल्ससाठी भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०२३ साली या बाजारपेठेत पाच मिलियन वाहने विकली गेली आणि येत्या काही वर्षात यामध्ये ६ ते ७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. वेगाने वाढत असलेल्या भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी मित्सुबिशी कॉर्पोरेशन टीव्हीएस मोबिलिटी ग्रुपसोबत आपले संबंध अधिक दृढ करत असून, विक्रीपश्चात सेवा पुरवणाऱ्या टीव्हीएस ऑटोमोबाईल सोल्युशन्समध्ये गुंतवणूक देखील करणार आहे. मल्टी-ब्रँड डीलर टीव्हीएस व्हीएमएसमध्ये गुंतवणूक केल्याने मित्सुबिशी कॉर्पोरेशनचे गुंतवणूक कव्हरेज विस्तारेल, सेवा क्षमता अजून जास्त वाढतील. आमच्या सर्वसमावेशक मोबिलिटी सोल्युशन्समध्ये विक्रीपश्चात सेवा, मल्टी-ब्रँड विक्रीबरोबरीनेच व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस मॉडेल आणि इतर ऑटोमोटिव्ह ऑपरेशन्सचा देखील समावेश करता येईल.”